Pali News : शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत हजारो पेंढ्यांच्या गंजी जळून खाक; जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

सुधागड तालुक्यातील पाली शहराजवळ असलेल्या झाप गावातील दोन शेतात बुधवारी (ता. 26) दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास वणवा लागला.
fire
firesakal
Updated on

पाली - सुधागड तालुक्यातील पाली शहराजवळ असलेल्या झाप गावातील दोन शेतात बुधवारी (ता. 26) दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास वणवा लागला. यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत वणव्यात हजारो पेंढ्यांच्या गंजी जळून खाक झाल्या. यामुळे पंधरा ते वीस हजारांचे नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

झाप येथील शेतकरी चंद्रगुप्त भालेराव, मंगेश भालेराव व सुधीर भालेराव या शेतकरी बांधवांच्या शेतावर असलेल्या जवळपास दोन हजार पेंढ्यांच्या गंज्या जळून खाक झाल्या आहे. पेंढ्यांना आग लागली हे समजताच शेतकरी शेतावर पोचले मात्र आगीने रुद्र रूप धारण केले होते. बघता बघता दोन्ही शेतांमध्ये असलेल्या पेढ्यांना आग लागली.

आणि शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत सर्व पेंडा जळून खाक झाला. आग विझवण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे आणि वेळही नसल्याने शेतकऱ्यांना काहीच करता आले नाही राहिले फक्त डोळ्यांमध्ये अश्रू.

याबाबत शेतकरी सुधीर भालेराव यांनी सांगितले की सदर आग मानवनिर्मित की नैसर्गिक वणव्याने लागली आहे, की एमएससीबीच्या विद्युत तारा शॉर्टसर्किट होऊन लागली आहे, याबाबत काही अंदाज नाही. तसेच तलाठी, कृषी अधिकारी व वीज वितरण अधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिलेली आहे. तरी घटनेचा पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळावी. अशी मागणी शेतकरी सुधीर भालेराव व चंद्रगुप्त भालेराव यांनी केली आहे.

रायगड जिल्ह्यात वारंवार मानवनिर्मित व निसर्गनिर्मित वनवा लागण्याच्या घटना घडत आहेत. याचा फटका पशुपक्ष्यांना तर बसत आहेत मात्र आता शेतकऱ्यांना देखील याचा हकनाक फटका बसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com