दापोलीतील गिम्हवणे गणपती मंदिराजवळ एकाच वेळी तीन बिबटे कॅमेऱ्यात चित्रित 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

या प्रकारामुळे गिम्हवणे गोडबोले आळीतील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

दाभोळ : दापोली शहराजवळील गिम्हवणे गणपती मंदिराजवळ असलेल्या समर्थ ज्वेलर्सचे मालक प्रकाश वैशंपायन यांच्या अंगणातून आज पहाटे 4.30 वाजता एक नव्हे तर तीन बिबटे जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेतऱ्यात चित्रित झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकारामुळे गिम्हवणे गोडबोले आळीतील नागरिकांमध्ये घबराट पसरली असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

गिम्हवणे गोडबोले आळीतील गणपती मंदिराच्या मागे घनदाट जंगल असून यापूर्वीही वैशंपायन यांच्या घराच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मध्यरात्री अनेक वेळा अंगणातून जाताना बीबट्या चित्रित झालेला होता. ही माहिती तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आली होती, त्यांनी जंगलात कॅमेरेही लावले होते. त्यानंतर काही कालावधीनंतर  बिबटे दिसायचे बंद झाले होते. मात्र आज पहाटे पुन्हा बिबट्यांचा वावर असल्याचे आढळून आले आहे.

हे पण वाचाही पदवीधरची निवडणूक आहे, आता माघार नाही ; डॉ. श्रीमंत कोकाटे

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three bibs in Dopoli captured on camera