रत्नागिरीत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू; 66 नवे रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 August 2020

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांपैकी आरटीपीसीआर चाचणीत रत्नागिरीतील 43 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये रत्नागिरी 5, कळबणी 5, लांजा 1, परकार हॉस्पीटल 10 घरडा हॉस्पीटल 2 असे एकूण 66 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

रत्नागिरी - जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. गुरुवारी (ता. 27) तीन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात 66 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी तालुक्‍यात आहेत. एकुण कोरोना रुग्णांची संख्या 3,641 झाली आहे. 

नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांपैकी आरटीपीसीआर चाचणीत रत्नागिरीतील 43 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये रत्नागिरी 5, कळबणी 5, लांजा 1, परकार हॉस्पीटल 10 घरडा हॉस्पीटल 2 असे एकूण 66 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी तालुक्‍यात पुन्हा रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. बुधवारी रात्री नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शहराजवळील नाचणे येथे चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गुडेवठार येथे 1, माळनाका येथे 1, निवळी 1, जिल्हा परिषद रोड येथे 2, नाचणे 4, गोडबोले स्टॉप 1, आंबेडकर भवन 1, गावखडी 1, खेडशी 2, साखरपा 1, टीआरपी 2, देवरुख 1, गोळप 1, खेड 1, सन्मित्र नगर 1 आणि जयगड येथे 1 रुग्ण सापडला आहे. 

गुरुवारी दिवसभरात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 127 वर पोचली आहे. मृतांमध्ये निवळीफाटा (ता. रत्नागिरी), कुवारबाव (ता. रत्नागिरी) आणि वेरळ (ता. खेड) येथील रुग्णांचा समावेश आहे. कोरोना बाधितांमध्ये उपचाराखाली असलेले ऍक्‍टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 1,190 इतके आहेत. 

जिल्ह्यातील 93 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यात जिल्हा शासकीय रुग्णालय येथील 11, कळबणी 1, संगमेश्वर 2, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण 48, घरडा 29, पेढांबे येथील 2 रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 2,324 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 

गणेशोत्सवासाठी आलेल्या चाकरमान्यांचा क्‍वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यामुळे होम क्‍वारंटाईनची संख्येत घट झाली आहे. 13 ऑगस्टपर्यंत 51 हजार लोकं होम क्‍वारंटाईन होती. सध्या ती संख्या साडेआठ हजारावर आहे. 

एकूण पॉझिटिव्ह 3,641 
बरे झालेले रुग्ण 2,324 
एकुण मृत्यू 127 
ऍक्‍टीव्ह पॉझिटिव्ह 1,190 
संस्थात्मक विलगीकरण 91 
होम क्वारंटाईन 8,848 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Death Due To Corona In Ratnagiri