esakal | मृत बिबट्याला जमिनीत पुरून त्याची तीन नखे ठेवली लपवून ; तिघे जण ताब्यात   
sakal

बोलून बातमी शोधा

three people arrested in lanja

बिबट्या पुरल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती.

मृत बिबट्याला जमिनीत पुरून त्याची तीन नखे ठेवली लपवून ; तिघे जण ताब्यात   

sakal_logo
By
रवींद्र साळवी

लांजा - मृत्यू झालेल्या बिबट्याला जमिनीत पुरून त्याची तीन नखे आपल्याकडे लपवून ठेवणाऱ्या वेरवली बुद्रुक येथील तिघांना वनखात्याने ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वेरवली बुद्रुक पवारवाडी येथील जयश्री साळसकर यांच्या जागेत बिबट्या पुरल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीनुसार परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. या ठिकाणी माती खोदून पाहिली असता मृत बिबट्या आढळूण आला. या बिबट्याचा दोन ते तिन दिवसांपूर्वी मृत्यु झाल्याचे पशु वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र या बिबट्याची तीन नखे गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी मिळालेल्या खबरीनुसार वेरवली बुद्रुक येथील तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दिनेश पवार (वय २८), रमेश आत्माराम साळसकर (वय ५५, दोघे राहणार वेरवली बुद्रुक पवारवाडी) आणि शंकर सखाराम देवळेकर (वय ५७ रा. वेरवली बुद्रुक, तेलीवाडी) यांना बिबट्याच्या तीन नखांच्या चोरी प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. 

ताब्यात घेतलेल्या तिघांनीही आपला गुन्हा कबूल केला असल्याचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी सांगितले.

हे पण वाचालांजा तालुक्यातील धक्कादायक प्रकार -  अवयव काढून परस्पर विल्हेवाट

या तिघांना लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना २७ ऑगस्ट पर्यंत कस्टडी दिली आहे. हा संपूर्ण तपास उप विभागिय अधिकारी र.शी.भवर यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड, लांजा वनपाल सागर पाताडे, वनरक्षक विक्रम कुंभार, सागर गोसावी, संजय रणधिर यांनी यशस्वीपणे केला.  

हे पण वाचा - संकेश्वरात ३०० वर्षांचा इतिहास असलेल्या निलगार गणपती`ची तीन राज्यात किर्ती

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image