esakal | साडेतेरा तासात २०० किलोमीटरचा प्रवास ; चिपळुणातील तीन सायकलस्वारांची कमाल
sakal

बोलून बातमी शोधा

three youth in chiplun within 13 hours travel 200 kilometers in chiplun ratnagiri

निर्धारित वेळेत अंतर पूर्ण करून या तिघांनी चिपळूणकरांची दखल इतरांना घ्यायला भाग पाडले. 

साडेतेरा तासात २०० किलोमीटरचा प्रवास ; चिपळुणातील तीन सायकलस्वारांची कमाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : चिपळूण सायकलिंग क्‍लबच्या विक्रांत आलेकर (सती-समर्थनगर), प्रसाद आलेकर (खेंड वसाहत), मुकुल सोमण (बापट आळी) या तीन तरुणांनी प्रथमच २०० कि.मी.च्या बीआरएम सायकलिंग स्पर्धेत यश मिळवले. सायकलने १३ तास ३० मिनिटात टप्पा पार केला. निर्धारित वेळेत अंतर पूर्ण करून या तिघांनी चिपळूणकरांची दखल इतरांना घ्यायला भाग पाडले. 

या साकलिंग स्पर्धेत त्यांना प्रामुख्याने श्रीनिवास गोखले, डॉ. स्वप्नील दाभोळकर यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व चिपळूण सायकलिंग क्‍लबच्या सदस्यांचा पाठिंबा लाभला. बीआरएम सायकलिंग इव्हेंट हा सायकलिंग क्षेत्रातील खूप जुना व प्रचलित इव्हेंट आहे. ज्याची सुरवात सुमारे १२३ वर्षांपूर्वी (१८९७) इटली या शहारापासून झाली. जो अविरतपणे आजतागायत निरंतर चालू आहे. 

या इव्हेंटची सुरवात भारतामध्ये २०११ या वर्षांपासून झाली. ज्याची कमान दिव्या ताटे (पुणे) या महिलेने सांभाळली होती. आता भारतामध्ये जवळपास सर्व मोठ्या शहरामध्ये तेथील सायकलिंग क्‍लब भरवत असतात. दरम्यान, या साकलपटूंचे आता पुढील लक्ष्य हे ३००, ४००, ६०० किलोमीटरच्या इव्हेंटकडे आहे. त्यासाठी ते चिपळूण शहर परिसरात नियमित सायकलिंगचा सराव करताना दिसत आहेत.

६०० किलोमीटर ४० तासांत 

बीआरएम सायकलिंग इव्हेंटमध्ये दिलेले निश्‍चित अंतर सायकलवरून दिलेल्या विशिष्ट वेळेत पूर्ण करावे लागते. २०० किलोमीटर १३.५ तासात, ३०० किलोमीटर २० तासात, ४०० किलोमीटर २७ तासात, ६०० किलोमीटर ४० तासात पूर्ण करावे लागते. या चारही इव्हेंटमध्ये जो कुणी सायकलिस्ट एका कॅलेंडर वर्षात पूर्ण करेल, त्याला एसआर हा मानाचा किताब मिळतो. चिपळूण शहरातील या ३ तरुणांनी या इव्हेंटमध्ये पुणे व मुंबई या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष सहभाग नोंदवून ते पूर्णही केले.

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top