तिलारीचा घाटरस्ता 17 ऑगस्टपासून होणार खुला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

दोडामार्ग - दोडामार्गला कोल्हापूर, बेळगावशी जोडणारा तिलारी घाट रस्ता 17 ऑगस्टपासून खुला होणार आहे. घाटरस्ता कोसळलेल्या ठिकाणी आरसीसी भिंत घालण्यात येणार आहे. चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी तसे पत्र चंदगडच्या तहसीलदारांना दिले आहे.

दोडामार्ग - दोडामार्गला कोल्हापूर, बेळगावशी जोडणारा तिलारी घाट रस्ता 17 ऑगस्टपासून खुला होणार आहे. घाटरस्ता कोसळलेल्या ठिकाणी आरसीसी भिंत घालण्यात येणार आहे. चंदगड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी तसे पत्र चंदगडच्या तहसीलदारांना दिले आहे. शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक गोपाळ गवस यांनी त्याबाबत माहिती दिली. 

उपअभियंत्यांनी पत्रात म्हटले आहे, की घाटरस्ता खचलेला होता, तेथे तीव्र स्वरूपाचा उतार आहे. माती भुसभुशीत असल्याने पाण्याच्या प्रवाहाने सहज वाहून जाणारी आहे. घाटात पावसाची संततधार असते. त्यामुळे तात्पुरती उपाययोजना टिकणारी नाही; किंबहुना हे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून आरसीसी भिंत बांधण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी कमीत कमी सव्वा महिन्याचा कालावधी लागणार आहे. ते काम पूर्ण करून रस्त्यावरील वाहतूक 17 ऑगस्टला सुरू करण्यात येईल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tilari Ghat road will starts from 17 August