esakal | पहिल्या दिवशी नाही मात्र नवव्या दिवशी झेंडू बाजार तेजीत
sakal

बोलून बातमी शोधा

tinkle flower market increased in today's rates are increased in ratnagiri

ग्राहकांनी पाठ फिरविल्याने हजारो किलो झेंडू व्यापाऱ्यांनी फेकून दिला. 

पहिल्या दिवशी नाही मात्र नवव्या दिवशी झेंडू बाजार तेजीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : राज्यात कोसळत असलेल्या पावसामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर बाजारात फुलांची आवक होईल का, याबाबत साशंकता होती. परंतु, गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस आटोक्‍यात आल्याने दसऱ्याच्या एक दिवस आधीच जवळपास ६० टक्के फुलांची बाजारपेठेत आवक झाली आहे. 

राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यात फुलांना विशेष फटका बसला. घटस्थापनेला भाव मिळेल, या आशेने शेतकऱ्यांनी ओला झेंडू येथे आणला. परंतु, ग्राहकांनी पाठ फिरविल्याने हजारो किलो झेंडू व्यापाऱ्यांनी फेकून दिला. 

हेही वाचा - चालक कम बॉडीगार्ड अशा दुहेरी भूमिकेतील डेअरिंगबाज सारथी लतिका -

दसऱ्यालाही असेच चित्र असेल, याची भीती व्यापाऱ्यांना होती. परंतु याच्या अगदी उलट परिस्थिती सध्या फुल बाजारात आहे.
दसऱ्याला एक दिवस बाकी असतानाच चिपळूणची किरकोळ बाजारपेठ ग्राहकांनी गजबजली. उत्तम प्रतीचा कोरडा झेंडू बाजारात आल्याने फुलांचा भावही दुपटीने वधारला. २२ ऑक्‍टोबरला व्यापाऱ्यांनी ४० ते ५० रुपये प्रतिकिलोने झेंडू विकला होता. त्याच झेंडूला शनिवारी १०० ते १२० रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. चांगल्या प्रतिचा झेंडू बाजारात आला.

भाताचे तुरे, आंब्याचे डहाळ

बऱ्याच ठिकाणी अजूनही पाऊस आहे. त्यामुळे काही फुले ओली, तर काही कोरडी अशा स्वरूपात येत आहेत. दरवर्षीच्या तुलनेने यंदा केवळ ६० टक्के फुले बाजारात आली आहेत. ६० ते ८० रुपये मीटर या दराने फुलांचे आयते तोरण विकले जात आहे. फुलांबरोबरच भाताचे तुरे, आंब्याचे डहाळ, आपट्याची पाने अशा वस्तूंची विक्री सुरू होती. 

हेही वाचा -  कोकण व्हाया दुबई ; कोकणची कृषीकन्या झाली लखपती -

"पावसामुळे फुलांची आवक कमी झाली. शिवाय, दसरा हा सण ग्रामीण भागातही तितक्‍याच उत्साहाने केला जात असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा माल जागेवरच विकला गेला. परिणामी, फुलांचे भाव वाढले तरी ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत."

- राजेंद्र शेलार, फुल विक्रेते

संपादन - स्नेहल कदम