
Sudhagad News
Sakal
पाली : वर्षानुवर्ष रखडलेला रस्ता, गावांमध्ये विकास कामाची बोंबाबोंब, कर भरूनही विकासाच्या नावाने ठेंगा, लोकप्रतिनिधींचे मतदानानंतर तोंडाला पान पुसण्याचे काम या सर्व गोष्टींना कंटाळून सुधागड तालुक्यातील नऊ गावांनी एकत्र येऊन आपला विकास आपणच करण्याचा निश्चय केला आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे रविवारी (ता.7) ग्रामस्थांनी स्वखर्चाने पाच्छापूर फाटा ते पाच्छापूर गाव हा सहा किलोमीटरचा रस्ता बनवण्यास सुरुवात केली आहे.