Ratnagiri Dam Mishap : तिवरे धरण फुटीस गळती कारणीभूत? याचा होणार अभ्यास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

चिपळूण - गेल्या दोन वर्षांपासून तिवरे धरणातून ग्रामस्थांना विसर्ग दिसत होता, त्याचा नेमका धरण फुटण्याशी संदर्भ आहे का?  हे तपासले जाईल आणि सर्व बाबींचा अभ्यास करून शासनाला वेळेत अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती  तिवरे धरण दुर्घटनेची चाैकशी करणाऱ्या समितीचे प्रमुख अविनाश सुर्वे यांनी दिली.

तिवरे धरण दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष चौकशी पथकाने आज घटनास्थळाची पाहणी केली. जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे हे या पथकाचे प्रमुख असून या पथकामध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता (लघुसिंचन), रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे.

या पथकाने ज्या ठिकाणी धरण फुटलं त्या ठिकाणची पाहणी या पथकाने पाहणी केली. तसेच जिथून घरं वाहून गेली त्या ठिकाणची सुध्दा या पथकाने पाहणी केली.  त्यानंतर ग्रामस्थांशी देखील या पथकाने संवाद साधला.. यावेळी ग्रामस्थांनी धरण फुटण्या आधीची दुरावस्था या पथकासमोर कथन केली.

काही तांत्रिक बाबी आहेत, त्याची आम्ही पाहणी केली. या सर्व बाबींचा अभ्यास करून ही दुर्घटना कशी घडली याचा सविस्तर अभ्यास केला जाईल. इथल्या ग्रामस्थांशी चर्चा केली. गेल्या दोन वर्षांपासून इथे ग्रामस्थांना विसर्ग दिसत होता, त्याचा नेमका याच्याशी संदर्भ आहे का, हेही तपासले जाईल आणि सर्व बाबींचा अभ्यास करून शासनाला वेळेत अहवाल सादर केला जाईल

- अविनाश सुर्वे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tivare Dam incidence Avinash Surve comment