esakal | Ratnagiri Dam Mishap : तिवरे धरण फुटले; 23 जण वाहून गेल्याचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri Dam Mishap : तिवरे धरण फुटले; 23 जण वाहून गेल्याचा अंदाज

Ratnagiri Dam Mishap : तिवरे धरण फुटले; 23 जण वाहून गेल्याचा अंदाज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : राज्यात गेले तीन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे. चिपळूण जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले असून त्यात तब्बल 23 जण वाहून गेल्याचा अंदाज आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील सगळ्यात मोठी घटना असून या मध्ये 12 ते 13 घरे आणि सुमारे 23 व्यक्ती वाहून गेल्याचा अंदाज आहे. पुण्यातून आणि सिंधुदुर्ग येथून  एनडीआरएफ ची पथके घटनास्थळी दाखल झाली आहे. . जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.  बाधित गावांमध्ये वालोटी, दळवटने, गाणे, सती, चिंचघरी, खेर्डी, चिपळूण यांचा समावेश आहे. 

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरण भरून वाहू लागले होते. धरणात मोठा पाणीसाठा झाल्याने त्यात अजून पावसाची भर पडली तर धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात होती.पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केल्याचेही समजत आहे. 

loading image
go to top