‘सकाळ’ कणकवली कार्यालयाचा आज वर्धापन दिन

विशेष ‘संस्कृती’ पुरवणी वाचकांच्या भेटीला
sakal logo
sakal logosakal
Updated on: 

कणकवली : ‘सकाळ माध्यम समूहा’च्या कणकवली कार्यालयाचा वर्धापन दिन उद्या (ता. २२) साजरा होणार आहे. या निमित्ताने ‘संस्कृती’ ही पुरवणी प्रसिद्ध करण्यात येईल.कोकणात ‘सकाळ’ने वाचक, हितचिंतक, विक्रेते आदींच्या पाठबळावर घट्ट पाय रोवले आहेत. ‘सकाळ’चे कोकणच्या सामाजिक जडणघडणीत मोठे योगदानराहिले आहे. कोकणवासीयांच्या अपेक्षांना शब्दांची वाचा फोडण्याबरोबरच इथल्या विकासासाठी नेमके काय हवे आहे,याची मांडणी वेळोवेळी‘सकाळ’ने केली.यातून वाचकांचे भक्कम असे जाळे कोकणात तयार झाले आहे.

sakal logo
मुलांसाठी आता न्युट्रिटिव्ह स्लाईस; शालेय पोषण आहारांतर्गत वाटप

सिंधुदुर्गाच्या विकासाच्या दृष्टीने ‘सकाळ’ने कायमच सकारात्मक भूमिका घेतली. पर्यटन, पायाभूत सुविधा, सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना नेहमी ठळक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यातून अनेक विकासात्मक मार्ग खुले झाले. सिंधुदुर्गाची संस्कृती आणि ‘सकाळ’ची ही वाटचाल कायमच हातात हात गुंफून चालतआली आहे.‘सकाळ’च्या येथील कार्यालयाचा वर्धापन दिन उद्या साजरा होत आहे.

यानिमित्ताने संग्राह्य अशी ‘संस्कृती’ ही पुरवणी प्रसिद्धकरीत आहोत. यात ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर, प्रसाद कुलकर्णी, प्रवीण दवणे आदींचे वाचनीयलेख आहेत.या पुरवणीतून कोकणची संस्कृती उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने ‘संस्कृती’ या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते कोरोनाचे नियम पाळून प्रकाशनहोणार आहे. याव्यतिरिक्त कोणताही कार्यक्रम किंवा भेटीगाठी होणार नाहीत. वाचकांचे पाठबळ असेच कायम राहील,अशी ‘सकाळ’ला खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com