
जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 749 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस सापडलेल्या नवीन रुग्णांमध्ये 10 आरटीपीसीआर चाचणीत तर 6 ऍण्टिजेनमध्ये बाधित आले आहेत. त्यात रत्नागिरी 13, चिपळूण 1, राजापूर 1 रुग्णाचा समावेश आहे.
रत्नागिरी - मागील चोवीस तासात 16 नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामधील सर्वाधिक 13 रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहे. ही रत्नागिरीकरांसाठी चिंताजनक गोष्ट आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात आतापर्यंत 8 हजार 749 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील चोवीस सापडलेल्या नवीन रुग्णांमध्ये 10 आरटीपीसीआर चाचणीत तर 6 ऍण्टिजेनमध्ये बाधित आले आहेत. त्यात रत्नागिरी 13, चिपळूण 1, राजापूर 1 रुग्णाचा समावेश आहे. रत्नागिरी तालुक्यातील रुग्ण संख्या दर दिवशी वाढत आहे.
परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा त्यात भरणा असल्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पावले उचलावी लागणार आहेत. गेल्या चोवीस तासात 263 जणांच्या अहवालापैकी 252 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह अहवालांची संख्या 54 हजार 393 आहे. 13 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 8 हजार 246 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 319 असून जिल्ह्यात बरे होण्याचा दर 94.25 टक्के आहे.