Raigad News : गाळामुळे मांडवा बंदरातील जलवाहतुकीला फटका; मेरिटाईम बोर्डाकडून काम सुरू

ओहोटीच्या वेळी पाणी कमी असल्याने होड्या बंदरात येण्यास अडथळा
man
man
Published on

Raigad News : मांडवा बंदरात साचलेल्या गाळामुळे प्रवासी जलवाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना वेळापत्रक सांभाळणे कठीण जात आहे. ओहोटीच्या वेळी पाणी कमी असल्याने होड्या बंदरात येण्यास अडथळा निर्माण होतो. त्‍यामुळे मेरिटाईम बोर्डाने गाळ काढण्यास सुरुवात केली आहे.

भरतीची वाट पाहत वाहतुकदारांना बसावे लागते. याचा फटका रो-रो सेवेलाही बसू लागला आहे. थर्टी फर्स्ट आणि त्यापूर्वी नाताळनिमित्त आलेल्या पर्यटकांना याचा फटका बसला. बंदराच्या नैसर्गिक स्थानामुळे दरवर्षी मांडवा जेटीलगत मोठ्या प्रमाणात गाळ साचतो.

येथून भाऊचा धक्का आणि गेट वे ऑफ इंडियादरम्यान प्रवासी वाहतूक सेवा सुरू असते. साधारण पावसाळ्यानंतर मांडवा बंदरातील गाळ काढण्यास सुरुवात होते. यंदा हे काम उशिराने सुरू झाले असून त्‍याचा फटका वाहतूकदारांना बसू लागला आहे.

जेटीपर्यंत होड्या येऊ शकत नसल्याने ओहोटीदरम्यानच्या फेऱ्या नाइलाजास्तव बंद ठेवाव्या लागतात. थर्टी फर्स्टनिमित्त आलेल्या पर्यटकांनाही याचा त्रास झाला. यामुळे मांडवा बंदरातील गाळ काढण्याची मागणी जोर धरू लागली.

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने हे काम नुकतेच हाती घेतले आहे. ३.५ मीटर खोली वाढेल, या अनुषंगाने गाळ काढला जात आहे. गाळ काढल्यानंतर मांडवा बंदरातील जलवाहतूक अधिक वेगाने सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


मांडवा बंदरात दरवर्षी साचणारा गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. सहा वर्षांत साधारण २०० कोटी रुपये गाळ काढण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने खर्च केले आहेत. तरीही गाळामुळे बंदराचे बांधकाम आणि ब्रेक वॉटर सिस्टिमबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रेक वॉटर बंधारा चुकीच्या ठिकाणी

बारमाही जलवाहतुकीसाठी मान्सूनमधील समुद्राच्या लाटा थोपवण्यासाठी मांडवा बंदरात १३५ कोटी रुपये खर्च करून ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र तो चुकीच्या ठिकाणी बांधल्‍याने पावसाळ्यात समुद्राच्या लाटांबरोबर येणारा गाळ बंधाऱ्यामुळे अडकतो. त्यामुळे जलवाहतुकीला फटका बसत असल्‍याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

गाळाची पातळी वाढल्याने जास्त वजनाच्या नौका बंदरात नांगरता येत नाहीत. गाळ काढण्याचे काम सुरू केल्यानंतर नौकानयनाला गती येईल. ओहोटीच्या वेळेला जो अडथळा येतो तो कमी होऊन जलमार्गावरील प्रवासी वाहतूक सुरळीत होईल.
- प्रकाश चव्हाण, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com