राधानगरी धरण भरले स्वयंचलितदरवाजे खुले

राधानगरी धरण भरले स्वयंचलितदरवाजे खुले

Published on

02497
राधानगरी ः पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे राधानगरी धरणात पाण्याची आवक वाढली आणि बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत सात स्वयंचलित दरवाजांपैकी पाच दरवाजे खुले होऊन भोगावती नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाला. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)

राधानगरी धरण भरले
पाच स्वयंचलित दरवाजे खुले; ७१४० क्सुसेक विसर्ग

राधानगरी, ता. २६ ः येथील राधानगरी धरण बुधवारी पूर्ण भरले असून, धरणाच्या स्वयंचलित दरवाजांपैकी पाच दरवाजे दुपारपर्यंत खुले झाले होते. त्यातून ७१४० आणि वीजनिर्मितीसाठीचा १४०० क्युसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जलाशय पाणी पातळी ३४७.५० फूट झाल्यानंतर स्वयंचलित दरवाजे टप्प्याटप्प्याने खुले होतात; मात्र पाणी व जोरदार वाऱ्याच्या दाबामुळे आज सकाळी सव्वाआठला पाणी पातळी ३४७.२० फुटांपर्यंत असतानाच सहा क्रमांकाचा दरवाजा खुला झाला. त्यानंतर पाणी पातळी वाढ होईल, तसे दुपारी दीडपर्यंत पाच, तीन, चार आणि सात क्रमांकाचे दरवाजे खुले झाले.
गतवर्षी धरण १० ऑगस्टला पूर्ण भरले होते. त्यावेळी धरण क्षेत्रात २१७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा धरण पंधरा दिवस अगोदरच भरले. धरण व पाणलोट क्षेत्रात अठरा जूनपासून पावसाला सुरुवात झाली. जुलैमध्ये सलग अतिवृष्टी आणि कमी काळात अधिक पाऊस झाल्याने धरण ३७ दिवसांतच भरले. यंदा आजअखेर धरण क्षेत्रात २२८२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पाऊस सुरू होण्याआधी धरणात जेमतेम एक टीएमसी पाणीसाठा होता. स्वयंचलित दरवाजांचे परिचलन गेली ७८ वर्षे अखंडितपणे सुरळीत सुरू आहे. यापूर्वी धरण जुलैच्या शेवटच्या आठवड्यात दोन वेळा भरले होते. दरम्यान, पडळी ते हत्तीमहाल दरम्यान असलेल्या भोगावती नदीवरील पुलावर बघता बघता पाणी आले. पूल पाण्याखाली गेल्याने मार्ग बंद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.