गेळे उपसरपंचपदी विजय गवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गेळे उपसरपंचपदी विजय गवस
गेळे उपसरपंचपदी विजय गवस

गेळे उपसरपंचपदी विजय गवस

sakal_logo
By

72430
गेळे ः सरपंच, उपसरपंचांचे अभिनंदन करताना संदीप गावडे आदी.

गेळे उपसरपंचपदी विजय गवस
सावंतवाडी ः गेळे ग्रामपंचायत सरपंचपदी सागर ढोकरे व उपसरपंचपदी विजय गवस यांची निवड झाल्यानंतर दोघांनी शुक्रवारी (ता. ३०) पदभार स्वीकारला. या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच, उपसरपंचांसह विजयी सदस्य गुरुदास गावडे, भगवान कदम, सुरेखा गावडे, सध्या गवस, रिना गवस, वैष्णवी विठ्ठल सावंत आदींचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी पंचायत समिती माजी सदस्य संदीप गावडे, मुख्य निवडणूक अधिकारी बी. आर. गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचिन सरपंच ढोकरे यांनी गावाचे प्रश्न सोडवण्यास व सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
.................
मालवणात ५ ला ताम्रपत्र वितरण
मालवण : मालवण एज्युकेशन सोसायटीच्या वतीने येथील टोपीवाला हायस्कूलचा ताम्रपत्र वितरण सोहळा ५ जानेवारीला सकाळी दहाला पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे. यात (कै.) डॉ. एस. एस. आजगावकर ताम्रपत्र डॉ. अनिल डोंगरे यांना, तर (कै.) डॉ. एस. के. पंतवालावलकर मानपत्र निखिल सामंत, डॉ. वैभव मंत्री यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद परुळेकर उपस्थित राहणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन सेक्रेटरी विजय कामत, मुख्याध्यापक डी. एस. खानोलकर यांनी केले आहे.