बेनगाव शाळेत कायदेविषयक धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेनगाव शाळेत कायदेविषयक धडे
बेनगाव शाळेत कायदेविषयक धडे

बेनगाव शाळेत कायदेविषयक धडे

sakal_logo
By

72437
माणगाव ः येथे मुलांना मार्गदर्शन करताना समुपदेशक.

बेनगाव शाळेत कायदेविषयक धडे

‘कोकण कला’चा उपक्रम; ६७ विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १ ः कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग, केंद्रीय समाज कल्याण बोर्ड अनुदानित महिला मंडळ कुडाळ संचलित कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र कुडाळ व महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अनुदानित महिला तक्रार निवारण, समुपदेशन, मदत व सल्ला केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देवी यक्षिणी माध्यमिक विद्यालय माणगाव-बेनगाव येथे शालेय मुलांसाठी ''सुरक्षित व असुरक्षित स्पर्श'' तसेच कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर झाले.
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवित आहे. आजकालच्या गंभीर स्थितीत मुलांना सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श यातील फरक समजावून सांगणे गरजेचे झाले आहे. लहान मुलांवरील अत्याचाराची, लैंगिक शोषणाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक गुन्ह्यांची सुरवात असुरक्षित स्पर्शातून होते. या अनुषंगाने संस्थेने बेनगाव शाळेतील मुलांना शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्रात शाळेतील एकूण ६७ विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला. संस्थेच्या वतीने प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, समुपदेशक समीर शिर्के, कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र, कुडाळच्या समुपदेशक करिष्मा परब, महिला व बालविकास विभाग सिंधुदुर्गच्या वतीने प्रियांका बाक्रे यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले. प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक गोविंदराव साटम, प्रशांत कांबळी, प्रज्ञा गुंजाळ, चंद्रशेखर पाटील यांचे सहकार्य लाभले. यावेळी मुलांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.