दाभोळ-दापोली तालुक्याची टॅंकरची गरज संपणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-दापोली तालुक्याची टॅंकरची गरज संपणार
दाभोळ-दापोली तालुक्याची टॅंकरची गरज संपणार

दाभोळ-दापोली तालुक्याची टॅंकरची गरज संपणार

sakal_logo
By

दापोली तालुक्याची टॅंकरची गरज संपणार
टंचाई कृती आराखडा बैठक ; टॅंकरग्रस्त गावांत जलजीवन मिशनमधून योजना
दाभोळता. १ ः दापोली तालुक्यातील टंचाई कृती आराखडा बैठक आमदार योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच रसिक रंजन नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीत पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात तालुक्यातील कोणत्याही गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार नसल्याची ग्वाही अधिकाऱ्यानी दिली.
तालुक्यात यावर्षी उन्हाळ्यात तामसतीर्थ, सालदुरे, उटंबर, केळशी, ओणनवसे, वणौशीतर्फे पंचनदी, आतगाव, उंबरशेत आदी ८ गावांतील १७ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. याचा गावनिहाय आढावा आमदार योगेश कदम यांनी घेतला. ही गावे टँकरमुक्त होण्यासाठी या गावांसाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत योजना प्रस्तावित असून त्यांची मंजुरी निविदा प्रक्रिया चालू असल्याचे या वेळी अधिकार्‍यांनी सांगितले. यामुळे या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीला उपस्थित असलेले सरपंच, ग्रामसेवकांना परिपूर्ण विंधन विहिरींचे प्रस्ताव देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. दापोली तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची पातळी वाढावी यासाठी बंधारे बांधण्याचे कार्यक्रम राबवण्याबाबत तालुका कृषी, जिल्हा परिषद कृषी व उपस्थित अन्य अधिकार्‍यांना आमदार योगेश कदम यांनी सूचना दिल्या.