नासा, इस्रो दौऱ्यासाठी वेदांत सनयेची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नासा, इस्रो दौऱ्यासाठी
वेदांत सनयेची निवड
नासा, इस्रो दौऱ्यासाठी वेदांत सनयेची निवड

नासा, इस्रो दौऱ्यासाठी वेदांत सनयेची निवड

sakal_logo
By

72467
वेदांत सनये

नासा, इस्रो दौऱ्यासाठी
वेदांत सनयेची निवड
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १ ः तालुक्यातील तांबळडेग येथील सुपुत्र वेदांत सनये या विद्यार्थ्याची रत्नागिरी जिल्‍हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या ''जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान'' या उपक्रमांतर्गत कुवारबाव (रत्‍नागिरी) शाळेतून नासा व इस्रोच्या भेट दौऱ्यासाठी निवड झाली आहे. अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या इस्रो व नासा या संस्थांच्या भेटीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण होण्यास प्रोत्साहन दिले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातून २७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वेदांत याचा समावेश आहे. वेदांत हा महालक्ष्मीनगर, कुवारबाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सातवीत शिकत आहे. अमेरिकन दुतावासातून व्हिसा प्राप्त झाल्यावर हे विद्यार्थी नासासाठी प्रयाण करणार आहेत. वेदांत याच्या यशाबद्दल तेथील शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, ग्रामपंचायत व पालकांनी कुवारबाव येथे वाजतगाजत त्याची मिरवणूक काढली. शाळेसाठी ही कामगिरी अभिमानास्पद असून तांबळडेग व कुवारबाव पंचक्रोशीतून त्याचे अभिनंदन करण्यात आले.