वेंगुर्लेतील सहा शाळांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेतील सहा शाळांची निवड
वेंगुर्लेतील सहा शाळांची निवड

वेंगुर्लेतील सहा शाळांची निवड

sakal_logo
By

वेंगुर्लेतील सहा शाळांची निवड
वेंगुर्ले ः वेंगुर्ले तालुकास्तरीय ‘बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव २०२२’ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत पहिल्या दिवशी तीन स्पर्धांमध्ये १८ शाळा सहभागी झाल्या. त्यापैकी ६ शाळांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली. सिद्धिविनायक मंगल कार्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत विजयी ठरलेल्या शाळांमध्ये ‘ज्ञानी मी होणार’ लहान गट-पिंपळाचे भरड शाळा (तुळस प्रभाग), मोठा गट-परबवाडा नं.१ (वेंगुर्ले प्रभाग), समुहगीत स्पर्धा लहान गट-तुळस वेताळ (तुळस प्रभाग), मोठा गट-वजराट नं.१ (तुळस प्रभाग), समूहनृत्य स्पर्धा-लहान गट- वेंगुर्ले शाळा नं.४ (वेंगुर्ले प्रभाग), मोठा गट-आडेली नं.१ (तुळस प्रभाग) यांचा समावेश आहे. गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व शाळांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
..............
नाभिक संघटनेची जामसंडेत सभा
देवगड ः येथील देवगड तालुका नाभिक संघटनेची सभा जामसंडे येथे झाली. सभेत श्री संत सेना महाराज यांच्या मूर्ती संदर्भात चर्चा करण्यात आली. जामसंडे वडांबा येथे नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि विभाग अध्यक्ष ओमकार चिंदरकर यांच्या उपस्‍थितीत सभा झाली. सभेत श्री संत सेना महाराज यांच्या मूर्ती संदर्भात चर्चा करून मूर्ती पंढरपूर येथून आणण्याचे ठरविण्यात आले. यासाठी रविवारी (ता. ८) पंढरपूर येथे जाण्याचे नियोजन करण्यात आले. संघटनेचे सचिव संदेश चव्हाण यांची तालुक्‍यातील दाभोळे येथील ग्रामपंचायतीच्या सदस्‍यपदी निवड झाल्‍याबद्दल गुलाबपुष्‍प देऊन त्‍यांचा सत्‍कार करण्यात आला. सभेत नवीन वर्षात नवीन दरपत्रकाप्रमाणे सर्व सलून व्यावसायिकांनी दर आकारणी करण्याचे आवाहन करण्यात आले.