कर्नाटकातून आलेले शेकडो मजूर पुन्हा गावी परतले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकातून आलेले शेकडो मजूर पुन्हा गावी परतले
कर्नाटकातून आलेले शेकडो मजूर पुन्हा गावी परतले

कर्नाटकातून आलेले शेकडो मजूर पुन्हा गावी परतले

sakal_logo
By

rat०२१५.txt

(टुडे पान २ साठीमेन)

फोटो ओळी
-rat२p४.jpg ः
७२६२९
चिपळूण ः कर्नाटकातून कामाच्या शोधात आलेले मजूर पुन्हा गावी जात आहेत.
----

कर्नाटकातून आलेले मजूर पुन्हा गावी परतले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा परिणाम ; भितीचे सावट ; विकासकामे रखडण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. २ ः महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये उद्धवलेल्या वादाने जिल्ह्यात कामाच्या निमित्ताने आलेले सीमाभागातील कामगार भयभीत झाले आहेत. आपल्याला मारहाण होईल किंवा झोपड्यांवर दगडफेक होईल या भितीने कामगार पुन्हा गावाकडे निघाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
कोकणातील स्थानिक कामगारांची मिळेल ते काम करण्याची मानसिकता नाही. त्याचा फायदा परप्रांतीय मजूर घेतात. रस्त्याचे तसेच अंगमेहनतीचे काम करण्यासाठी बेळगाव, सोलापूर, हुबळीसह कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या गावातील मजूर कोकणात येतात. पावसाळा संपला की, कर्नाटकातील मजूर ट्रॅक्टरने सहकुटुंब सहा महिने पुरेल इतके साहित्य घेऊन कोकणात येतात. मोकळ्या जागांवर मिळेल तेथे झोपड्या टाकून राहतात. या कामगारांना कोकणात मजुरी जास्त मिळते. साधारण एक महिला व एक पुरुष अशा जोडीला १२०० ते १५०० रुपये दिवसा मिळतात. त्यामुळे दरवर्षी शेकडो मजूर कामासाठी कोकणात येतात. यावर्षीही पावसाळा संपल्यानंतर कर्नाटकातील मजूर कोकणात येण्यास सुरवात झाली होती; मात्र कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केल्यानंतर दोन्ही राज्याचे राजकारण तापले. केंद्र सरकारपर्यंत हा वाद गेला. कर्नाटकात मराठी लोकांवर अन्याय सुरू झाला. त्याच्या बातम्या कानावर पडू लागल्यानंतर कोकणात कामाच्या निमित्ताने आलेले कर्नाकटातील कामगार भयभीत झाले. कर्नाटकात मराठी माणसावर अत्याचार सुरू झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले तर काय करायचे या भितीने अनेक कामगारांनी पुन्हा घरी जाण्यास सुरवात केली आहे.

हुबळी येथील कृष्णा चव्हाण हा तरुण दरवर्षी २२ कामगारांना घेऊन चिपळूणमध्ये येतो. खेर्डीत झोपडी टाकून राहतो. मिळेल ते काम करतो. यावर्षी त्याने सहा कामगार वाढवले होते; मात्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद सुरू होताच तो आपल्या कामगारांना घेऊन पुन्हा गावी परतला. अशाच प्रकारे कर्नाटक राज्यातील अनेक कुटुंबे गावी परत जात असल्याचे चित्र आहे. कोकणात सध्या जलजीवन अंतर्गत पाणीयोजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. जमिनीत पाईप टाकण्यासाठी खोदाईचे काम करावे लागते. त्यात कर्नाटकातील कामगार माहीर आहेत; मात्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद सुरू होताच अनेक कामगार परत जात असल्यामुळे पाणीयोजनेची कामे ठप्प होण्याची भिती आहे. त्याशिवाय रस्त्याची कामेही बंद पडण्याची भिती आहे.

कोट
मी कोकणात १६ वर्ष येत आहे. आतापर्यंत आम्हाला कधी त्रास झाला नाही; मात्र या वेळी कर्नाटकात मराठी माणसावर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. त्यामुळे आम्हाला भिती वाटू लागली आहे. कर्नाटकमध्ये हा संघर्ष तीव्र झाला आहे. त्यामुळे गावातील लोक आम्हाला परत येण्यास सांगत आहेत. त्यामुळे गावी जात आहे. परिस्थिती सुधारली की पुन्हा येईन.
- कृष्णा चव्हाण, मुकादम हुबळी कर्नाटक