
राष्ट्र सेविका समितीतर्फे कुडाळमध्ये पथसंचलन
swt२१.jpg
७२६३२
कुडाळः राष्ट्र सेविका समितीतर्फे शहरामध्ये पूर्ण पथसंचलन करण्यात आले.
राष्ट्र सेविका समितीतर्फे
कुडाळमध्ये पथसंचलन
कुडाळ, ता. २ः राष्ट्र सेविका समितीतर्फे काल (ता. १) सायंकाळी शहरामध्ये पूर्ण गणवेशामध्ये पथसंचलन करण्यात आले. यामध्ये बाल, तरुणी, गृहिणी अशा एकूण ५२ सेविका होत्या. सर्व प्रथम कुडाळ हिंदू कॉलनी येथे शाखा लावून नंतर संचालनाला सुरुवात करण्यात आली. हिंदू कॉलनी ते गांधी चौक व परत हिंदू कॉलनी असा संचलनाचा मार्ग होता. अतिशय जोशपूर्ण व शिस्तबद्ध अशाप्रकारे हे संचलन पार पडले. यामध्ये कणकवली, देवगड तालुका तसेच गोव्यातूनही अधिकारी व सेविका उपस्थित होत्या. यासाठी संघ बंधूंचीही मोलाची मदत झाली. सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. ‘वंदे मातरम’ने सांगता करण्यात आली.
................
चुनवरे येथे ७ ला विविध कार्यक्रम
कुडाळः अवधूत स्वामी श्री भालचंद्र गावडे महाराज भक्त मंडळ न्यास चुनवरे (ता. मालवण) यांच्यावतीने भालचंद्र गावडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पौष कृष्ण पक्ष प्रतिपदेला म्हणजेच शनिवारी (ता. ७) चुनवरे येथे अखंड नामस्मरणासह विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. पहाटे काकड आरती, सकाळी सद्गुरूंना दुग्धाभिषेक व आरती, धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी भजने, नित्य हरिपाठ, आरती आदी कार्यक्रम होणार आहेत. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अवधूत स्वामी श्री भालचंद्र गावडे महाराज भक्त मंडळ न्यास यांनी केले आहे.
.............