गुरुवारी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुवारी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर
गुरुवारी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

गुरुवारी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

sakal_logo
By

rat0220.txt

(टुडे पान 3 साठी)


गुरुवारी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये आयोजन ; सर्वसामान्यांनी लाभ घेण्याचे आवाहान

दाभोळ, ता. 2 ः भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 29वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर 5 जानेवारीला पुण्यातील संचेती हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था व चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांनी दिली आहे.
विश्वविख्यात प्लास्टिक सर्जन स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित (अमेरिका) यांनी भारतात येऊन 2 लाख 88 हजारापेक्षा जास्त मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या होत्या. मागील 11 वर्षापासून त्यांच्या स्मरणार्थ देशभरात या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मानवसेवेचा हा महायज्ञ त्यांचे अमेरिकेतील सुशिष्य प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टन, डॉ. बॅरी सिट्रॉन, डॉ. लॉरेन्स ब्रेनर, लिंडा पॅटरसन यांनी गेल्या 11 वर्षापासून पुढे चालू ठेवला आहे. येत्या 5 ते 8 जानेवारीच्या शिबिरामध्ये अंदाजे 200 ते 300 रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये मुख्यत्वेकरून दुभंगलेले ओठ, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, चिकटलेली हाताची बोटे, फुगलेले गाल अशा प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार असल्याचे शिबिर प्रमुख शशिकांत मुनोत यांनी कळवले आहे. कोविड प्रोटोकॉलमुळे यावर्षी चेहऱ्यावरील व्रण व डाग यावर शस्त्रक्रिया होणार नाहीत. रुग्णांची नोंदणी व तपासणी फक्त 5 जानेवारीला सकाळी 9 ते 2 पर्यंत होणार असून 6 ते 8 जानेवारी निवडलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी विजय पारख व राजेंद्र सुराणा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.