
३८ उमेदवारांचे अर्ज छाननीत ठरले वैध
३८ उमेदवारांचे अर्ज
छाननीत ठरले वैध
‘देवगड अर्बन’साठी निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २ : येथील दी देवगड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत १३ जागांसाठी दाखल केलेले सर्व ३८ उमेदवारी अर्ज आजच्या छाननीत वैध ठरले.
बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत १३ जागांसाठी एकूण ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. निवडणुकीत एकूण ११ हजार ५२४ मतदार निश्चित झाले आहेत. यामध्ये देवगड तालुक्यातील सात व इतर सर्व तालुके मिळून एक असे एकूण आठ संचालक सर्वसाधारणमधून, दोन महिला संचालक तसेच अनुसूचित जाती जमातींमधून एक, इतर मागास प्रवर्गातील एक आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यातून एक असे एकूण १३ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी १३ जागांसाठी एकूण ३८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी आज झाली. यामध्ये सर्व अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापासून (ता.३) १७ जानेवारीपर्यंत आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी १८ ला प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदान प्रक्रिया २९ ला होणार असून, ३० ला मतमोजणी करण्यात येणार आहे.