आर्चिणे विद्यालयात मोडी लिपी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्चिणे विद्यालयात 
मोडी लिपी कार्यशाळा
आर्चिणे विद्यालयात मोडी लिपी कार्यशाळा

आर्चिणे विद्यालयात मोडी लिपी कार्यशाळा

sakal_logo
By

72773
आर्चिणे ः मोडी लिपी कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ॲड. विलास कडू.

आर्चिणे विद्यालयात
मोडी लिपी कार्यशाळा
वैभववाडी, ता. २ ः आजोबा, पणजोबांच्या काळातील चालीरीती, परंपरा आजही आपण जोपासत आहोत; परंतु त्यांच्या काळातील मोडी लिपी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. तिचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. या लिपीच्या प्रसारासाठी प्रयत्नांची गरज मोडी लिपीचे अभ्यासक ॲड. विलास कडू यांनी येथे व्यक्त केली.
आर्चिणे येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात मोडी लिपी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेला मोड लिपीचे अभ्यासक ॲड. कडू यांच्यासह हिरोबा सावंत, उद्योजक पंडितराव रावराणे, मुख्याध्यापक चंद्रशेखर कारेकर, संदेश तुळसणकर आदी उपस्थित होते. मोडी लिपी १९५४ मध्ये व्यवहारातून बंद झाली. या लिपीतील लाखो दस्तऐवज आहेत; परंतु ही लिपी वाचणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली. मोडी लिपीचे अस्तित्व टिकविण्यासाठी ती विद्यार्थ्यांनी शिकण्याची गरज आहे. या संदर्भात विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन कार्यशाळा घेणार आहोत. मोडी लिपीच्या संवर्धनासाठी हा उपक्रम हाती घेणार आहे, असे अॅड. कडू यांनी स्पष्ट केले.