विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांचा सत्कार
विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

rat०३१५.txt

( टुडे पान ३)

rat३p८.jpg ः
७२८५९
लांजा ः वेदिका वारंगे हिचा सत्कार करताना पदाधिकारी.
rat३p९.jpg ः
७२८६०
आर्यन गुरव याचा सत्कार करताना पदवीधर संघटनेचे पदाधिकारी.
rat३p७.jpg ः
७२८५८
आशिष गोबरे याचा लांजा तालुका पदवीधर शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार करताना पदाधिकारी.


नासा, इस्रो भेटीला जाणाऱ्यांचा सत्कार

पदवीधर शिक्षक संघटना ; तिघानाही आर्थिक साह्य

लांजा ,ता.३ ः नासा व इस्रो या संस्थांना भेटी देण्यासंदर्भातच्या परीक्षेत लांजा तालुक्यात प्रथम क्रमांकांने उत्तीर्ण झालेला शिरवली शाळेचा विद्यार्थी आशिष गोबरे हा केरळ येथील इस्रो या संस्थेला भेट देण्यासोबतच अमेरिकेतील नासा या संस्थेला भेट देण्यासाठी जाणार आहे. त्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल लांजा तालुका पदवीधर शिक्षक संघटनेच्यावतीने आशिषचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एक स्तुत्य उपक्रम आयोजित करून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नासा व इस्रो या संस्थांना भेटी देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक तालुक्यातून तीन विद्यार्थी निवडण्यात आले. रत्नागिरी जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी हाती घेतलेल्या शैक्षणिक उपक्रमांचे पदवीधर शिक्षक संघटनेने स्वागत केले आहे.

लांजा तालुक्यातील आशिष गोबरे याच्या यशाबद्दल लांजा तालुका पदवीधर शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या वेळी त्याला मोठ्या प्रवासाच्या पूर्वतयारीसाठी रक्कम रु. ३ हजार तसेच सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर वनगुळे नं. १ शाळेतील आर्यन गुरव या विद्यार्थ्याने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केले आहे. आर्यन इस्रो या संस्थेला भेट देण्यासाठी जाणार आहे. त्याबद्दल त्याचा पदवीधर शिक्षक संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या वेळी आर्यनला १५००/-रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. लांजा नं. ५ शाळेची विद्यार्थिनी वेदिका वारंगे हिने तालुक्यात तृतीय क्रमांक प्राप्त केला. तिलासुद्धा इस्रो या संस्थेला भेट देण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. या वेळी तिला रोख रक्कम १५०० रु. व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या तीनही विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तालुक्यातील या तीनही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर, तालुकाध्यक्ष संजय डांगे, जिल्हा कोषाध्यक्ष संजय विश्वासराव, भागवत कुंभार, कार्याध्यक्ष विश्वनाथ सुर्वे, कोषाध्यक्ष प्रकाश जाधव, अमित गराडे, शशिकांत बंडबे, रंगनाथ सरपोतदार, दयानंद लाखण, रामचंद्र तुळसणकर, वसंत शिंदे, विजय विश्वासराव, रवींद्र निवळे, संदीप घोरपडे, भागवत ठणके आदी पदाधिकारी उपस्थित होते.