फोटोसंक्षिप्त-''योगयोगेश्वर जयशंकर''च्या शीर्षक गीतास पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटोसंक्षिप्त-''योगयोगेश्वर जयशंकर''च्या
शीर्षक गीतास पुरस्कार
फोटोसंक्षिप्त-''योगयोगेश्वर जयशंकर''च्या शीर्षक गीतास पुरस्कार

फोटोसंक्षिप्त-''योगयोगेश्वर जयशंकर''च्या शीर्षक गीतास पुरस्कार

sakal_logo
By

L72924

फोटोसंक्षिप्त


‘योगयोगेश्वर जयशंकर''च्या शीर्षक गीतास पुरस्कार
तळेरे : अनेक लोकप्रिय मालिकांचे शीर्षक गीत आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी कुणाल भगत आणि करण सावंत यांनी ''योगयोगेश्वर जयशंकर'' मालिकेसाठी संगीतबध्द केलेल्या गीतास ''सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत'' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ''बीग मराठी एंटरटेनमेंट'' पुरस्कार सोहळ्यात त्यांना गौरविण्यात आले. या जोडीमधील भगत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगावचे सुपुत्र, तर सावंत हे महाड येथील आहेत. या जोडगोळीने आतापर्यंत महामिनिस्टर, किचन कल्लाकार, बस बाई बस, नवा गडी नवं राज्य, बॅंड बाजा वरात, अगं अगं सूनबाई काय म्हणता सासूबाई अशा तब्बल 14 मालिकांची शीर्षक गीते संगीतबद्ध केली आहेत. याबाबत संगीतकार कुणाल- करण यांनी ह्या शीर्षक गीताला सगळ्यात जास्त मते मिळून ''बिग मराठी एंटरटेनमेंट'' पुरस्कार मिळाला. हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.

त्रिंबक हायस्कूलचे व्हॉलीबॉल स्पर्धेत यश
आचरा ः मालवण टोपीवाला हायस्कूलच्या मैदानावर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा नुकत्याच झाल्या. या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर ,सिंधुदुर्ग, रत्नागिरी असे पाच जिल्ह्यांतील संघ सहभागी झाले होते. तृतीय क्रमांकासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत लढत होऊन यामध्ये जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या विद्यार्थिनींनी 25-18 अशी आघाडी घेऊन तिसरा क्रमांक पटकावला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अण्णा सकपाळ, सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक प्रवीण घाडीगावकर, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थांनी अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक महेंद्र वारंग यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.