चार राज्यातून भारतात येताना कोरोना चाचणी सक्तीची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार राज्यातून भारतात येताना कोरोना चाचणी सक्तीची
चार राज्यातून भारतात येताना कोरोना चाचणी सक्तीची

चार राज्यातून भारतात येताना कोरोना चाचणी सक्तीची

sakal_logo
By

rat०३३१.txt

( पान ५ )

चार देशासाठी कोरोना चाचणी सक्तीची

पर्यटकांची संख्या कायम ; खर्चात मात्र होणार वाढ

चिपळूण, ता. ३ ः कोरोनाची लाट येईल की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे; मात्र चीन, हाँगकाँग, थायलण्ड अणि सिंगापूर या चार देशांतून परत भारतात येताना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही; मात्र खर्चात वाढ झाल्याची माहिती पर्यटनक्षेत्रात काम करणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सी चालकांनी दिली.
चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा फटका भारतासह जगातील पर्यटन क्षेत्राला बसला आहे. काही देशांनी येताना आणि जातानाही कोरोना चाचणी अनिर्वाय केल्याने ऐन पर्यटनाच्या हंगामात परदेशी बुकिंग रद्द होत आहेत. त्याचा मोठा फटका ट्रॅव्हल्स एजन्सी व पर्यटकांना बसत आहे. चिपळुणातील सचिन कुलकर्णी हे केसरी ट्रॅव्हल्सचे काम पाहतात. ते म्हणाले, डिसेंबर ते फेब्रुवारी हा देशांतर्गत तसेच परदेशवारीसाठी पर्यटनाचा हंगाम असतो. पर्यटनासाठी विमान व त्या देशातील इतर खर्च कमी असल्याने अनेकांनी दोन-तीन महिन्यापूर्वी बुकिंग केले आहे. काही सहली परदेशात पोहोचल्या आहेत. तोपर्यंत चीनमध्ये कोरोनाची लाट सुरू झाली आहे. या लाटेची तीव्रता खरोखरच गंभीर आहे का या विषयी अजून खात्री नाही. तोपर्यंत इतर देशांनी पर्यटकांना येता-जाताही एचआरसीटी चाचणी करणे सक्तीचे केले आहे.
भारतात लसीकरण चांगले झाले आहे. त्यामुळे भारतातील लोकांना कोरोनाचा जास्त धोका नाही. त्यामुळे एप्रिल-मे महिन्यातील बुकिंग सुरू आहे. काही लोकांनी आपले बुकिंग रद्द केलेले नाही; मात्र प्रलंबित ठेवले आहेत. परदेशातून येताना विमानतळावर २ टक्के लोकांची चाचणी केली जात आहे. एखादा रुग्ण कोरोनाबाधित आढळला तर दहा दिवस अलगीकरण करण्याची सक्ती काही देशांनी घातली आहे. या भीतीने अनेकांची बुकिंग रद्द होण्याची शक्यता आहे.
अचानक सहल रद्द झाल्यानंतर विमान कंपन्यांही हात वर करत आहेत. विमान कंपनीमुळे सहल रद्द झाली तर त्याची भरपाई देऊ; पण स्वतःहून पर्यटकांनीच सहल रद्द केली तर त्याचा शंभर टक्के परतावा मिळणार नाही, असे विमान कंपन्यांकडून सांगितले जात आहे. परिणामी, बुकिंग केलेल्या पर्यटकांना सहल रद्द केल्यानंतर मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. देशांतर्गत कोरोनाची साथ संपल्याने व देशातील शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने इतर देश-विदेशातील सर्वच सहली हाउसफुल आहेत. विदेशातील अनेक पर्यटनस्थळे खुली झाली असल्याने तिकडेही लोकांचा ओढ वाढला असताना काही देशात कोरोनाविषयीच्या नियमांची अंमलबजावणी होत असल्याने आणि हंगामात पर्यटनक्षेत्रात धास्ती निर्माण झाली आहे

कोट
भारतात लसीकरण चांगले झाले आहे. त्यामुळे भारतातील लोकांनी घाबरण्याचे काहीच कारण नाही. देशात आणि देशाबाहेर सहलींना चांगला प्रतिसाद आहे. काही लोकांच्या मनात भिती आहे; पण पुढील काही दिवसात ती भिती निघून जाईल.

- सचिन कुलकर्णी, रूद्र एंटरप्रायझेस चिपळूण