
मालवण कॉलेजच्या संघाला भाजपकडून आर्थिक मदत
73147
मालवण ः राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या मुलींच्या संघास मदत सुपूर्द करताना पूजा करलकर. शेजारी भाजपचे पदाधिकारी.
मालवण कॉलेजच्या संघाला
भाजपकडून आर्थिक मदत
मालवण, ता. ३ : येथील टोपीवाला हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील मुलींचा संघ लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरला आहे. या संघाच्या प्रवास व अन्य खर्चासाठी येथील भाजप महिला कार्यकारिणीतर्फे आर्थिक मदत कर्णधार अनुष्का आंबेरकर यांच्याकडे महिला आघाडी तालुकाध्यक्षा पूजा करलकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
यावेळी भाजप पदाधिकारी चारुशीला आचरेकर, पूजा सरकारे, प्रिया कांबळी, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, गणेश कुशे, महेश सारंग, प्रमोद करलकर, ललित चव्हाण, बाळू मालवणकर, प्रशिक्षक सुशील शेडगे आदी उपस्थित होते. मुलींच्या या संघाने विनर्स स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून प्रशिक्षक संदीप पेडणेकर, सुशील शेडगे, ज्ञानेश केळुसकर, विल्सन फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हास्तर, कोल्हापूर विभागस्तर याठिकाणी विजय संपादन करत हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. लवकरच राज्यफेरीसाठी हा संघ रवाना होणार आहे. १९ वर्षांखालील मुलींचा संघ असा ः अनुष्का आंबेरकर (कर्णधार), तन्वी सरकारे, गार्गी जुवेकर (यष्टीरक्षक), सानिका मेस्त्री, दीक्षा मालवणकर, जानव्ही मालंडकर, भूमिका परब, ऋतुजा पोपकर, शारदा सुर्वे, संस्कृती शेडगे, सानिया आजगावकर, रिया गावडे, सानिका मांजरेकर.