निवृत्त कर्मचाऱ्यांचा सिंधुदुर्गनगरीत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निवृत्त कर्मचाऱ्यांचा 
सिंधुदुर्गनगरीत सत्कार
निवृत्त कर्मचाऱ्यांचा सिंधुदुर्गनगरीत सत्कार

निवृत्त कर्मचाऱ्यांचा सिंधुदुर्गनगरीत सत्कार

sakal_logo
By

73176
सिंधुदुर्गनगरी ः निवृत्त हवालदार दिनकर तेली यांना पेन्शन मंजूर प्रकरणाचे आदेश देताना बीडीओ प्रजित नायर. सोबत राजेंद्र पराडकर, वल्लरी गावडे आदी.

निवृत्त कर्मचाऱ्यांचा
सिंधुदुर्गनगरीत सत्कार
ओरोस ः नियत वयोमानानुसार ३१ डिसेंबरला निवृत्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या १० कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केला. या वेळी सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे उपस्थित होते. नायर यांच्या दालनात हा कार्यक्रम झाला. सत्कारमूर्ती असे ः सावंतवाडी पंचायत समितीचे हवालदार दिनकर तेली, मुख्याध्यापक सीमा चव्हाण, ज्योती शिरोडकर, सुशीला शेळके, प्रकाश सावंत, उपशिक्षक पंढरीनाथ गोसावी, पदवीधर शिक्षक रंगराव वडर, संगणक कर्मचारी कृष्णकांत मांजरेकर, आरोग्य सहाय्यिका रतन आरोलकर, प्रतिज्ञा घाडी. या सर्वांची पेन्शन प्रकरणे मंजूर असून त्याचे आदेश यावेळी त्यांना देण्यात आले.
...................
73151
गजानन रेवडेकर

गजानन रेवडेकरांना ‘समाजसेवा’
तळेरे ः एकता कल्चरल अकादमी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय एकता पुरस्कारासाठी नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे संचालक आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन रेवडेकर यांची निवड अकादमीच्या निवड समितीने केली. याबद्दल रेवडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. रेवडेकर यांनी नांदगाव विकास मंडळ, हरिओम् ट्रस्ट, सहकार शिक्षण संस्था, पारशीवाडी मित्र मंडळ, स्वामी समर्थ कट्टा आर्थररोड, श्री लक्ष्मीनारायण मंदिर परिसर भाडेकरू संघ, देवगिरी रहिवाशी संघ, अदाणी स्थानीय लोकाधिकार समिती, बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन, केवल्य सेवा मंडळ आणि विद्यार्थी उत्कर्ष मंडळ आदी नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय, क्रीडा-कला, धार्मिक क्षेत्रात योगदान दिले आहे. पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ समाजसेवेतील वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल रेवडेकर यांची निवड झाली.
---

73174
नेमळे ः बालिका दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी साकारलेल्या वेषभूषा.

नेमळे शाळेत बालिकादिन
सावंतवाडी ः क्रांतिज्योती सावित्री बाई फुले जयंतीनिमित्त पूर्ण प्राथमिक शाळा नेमळे नं. १ येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या. आदर्श शिक्षिका आणि थोर समाज सेविका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी भाषणे करून त्यांचे कार्याचा आढावा घेतला. या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.