वेंगुर्लेत भाजप प्रभावी पक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत भाजप प्रभावी पक्ष
वेंगुर्लेत भाजप प्रभावी पक्ष

वेंगुर्लेत भाजप प्रभावी पक्ष

sakal_logo
By

73190
वेंगुर्ले ः येथे भाजपच्यावतीने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

वेंगुर्लेत भाजप प्रभावी पक्ष

राजन तेली ः तालुक्यातील सरपंच, सदस्यांचा सत्कार

वेंगुर्ले, ता. ४ ः तालुक्यात भाजप हा अत्यंत प्रभावी असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केले. येथील भाजपच्यावतीने नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
या सत्कार कार्यक्रमात भाजपाच्या १३ सरपंच, १६ उपसरपंच व १२५ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संघटन जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास कुडाळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर व सोमनाथ टोमके, जिल्हा चिटणीस निलेश सामंत, महिला मोर्चा अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा परिषद सदस्य प्रीतेश राऊळ, वसंत तांडेल व साईप्रसाद नाईक, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आसोली सरपंच बाळा जाधव, उपसरपंच संकेत धुरी, परबवाडा सरपंच शमिका बांदेकर, उपसरपंच पप्पू परब, तुळस सरपंच रश्मी परब, उपसरपंच सचिन नाईक, पाल सरपंच कावेरी गावडे, उपसरपंच प्रीती गावडे, वेतोरे सरपंच प्राची नाईक, उपसरपंच संतोषी गावडे, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील, उपसरपंच उमा करंगुटकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, उपसरपंच महादेव सापळे, परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, संजय दुधवडकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, उपसरपंच नमिता नागोळजकर, आडेली सरपंच यशस्वी कोंडस्कर, उपसरपंच परेश हळदणकर, चिपी सरपंच माया माडये, उपसरपंच प्रकाश चव्हाण, मठ सरपंच रुपाली नाईक, उपसरपंच महादेव गावडे, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, भोगवे उपसरपंच रुपेश मुंडये, म्हापण उपसरपंच श्रीकृष्ण ठाकूर, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर यांचा सत्कार झाला.