लांजा-17 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-17 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात
लांजा-17 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात

लांजा-17 जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात

sakal_logo
By

१७ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात
लांजा खरेदी-विक्री संघ निवडणूक; ६४ पैकी २७ जणांची माघार
लांजा, ता. ४ः लांजा तालुक्यातील सहकार क्षेत्राचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांजा तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या ३ जानेवारी या अखेरच्या दिवशी ६४ पैकी २७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता १७ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.
लांजा तालुका खरेदी-विक्री संघाची निवडणूक ही नेहमीच चर्चेची आणि लक्षवेधी ठरते. सलग पाच वर्षांची मुदत संपल्यानंतरही कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्षांची संचालक मंडळाला वाढ देण्यात आली होती. त्यामुळे या निवडणुकीला आता फार काळ उशीर झाल्याने ही निवडणूक आता १५ जानेवारीला होत आहे. संघाच्या एकूण १७ जागांसाठी यापूर्वी ६४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. ३ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २७ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता संघाच्या १७ जागांसाठी ३७ उमेदवार हे रिंगणात राहिले आहेत.
दरम्यान, संघाची निवडणूक ही १५ जानेवारीला होणार आहे. या दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार असून, याच दिवशी पाचनंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. संघाचे एकूण सभासद हे १६६४ इतके असून मतमोजणी ही खरेदी -विक्री संघाच्या पहिल्या मजल्यावर होणार आहे. त्यामुळे आता १७ जागांसाठी ३७ म्हणजे जवळपास दुप्पट उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीत रंगत येणार आहे.