
प्रा. आशा कानकेकरांना ‘कोकणरत्न’
73199
तळेरे ः प्रा. आशा कानकेकर यांना ‘कोकणरत्न’ देताना मान्यवर.
प्रा. आशा कानकेकरांना ‘कोकणरत्न’
तळेरे ः येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रा. आशा कानकेकर यांना ‘कोकणरत्न’ पुरस्कार प्राप्त झाला. कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. प्रा. कानकेकर गेली २० वर्षे ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांनी कोकण बोर्ड रत्नागिरी येथे बारावी परीक्षा हिंदी विषयाचे मुख्य नियमक या मानाच्या स्थानावर कामगिरी बजावली आहे. विभागस्तरावर हिंदी विषयाचे मार्गदर्शन शिक्षक परीक्षार्थींना केले आहे. त्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन पुरस्काराने गौरविण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथे शरद कृषी भावनात झालेल्या कार्यक्रमास कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर उपस्थित होते. तळेरे पंचक्रोशी प्रसारक मंडळाचे श्रीकृष्ण खटावकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.