लांजा ः काम न करताच अडीच लाख अदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा ः काम न करताच अडीच लाख अदा
लांजा ः काम न करताच अडीच लाख अदा

लांजा ः काम न करताच अडीच लाख अदा

sakal_logo
By

काम न करताच अडीच लाख अदा
रावरी बापेरे ग्रामपंचायतीतील कारभार; २६ जानेवारीला उपोषण
लांजा, ता. ४ ः प्रत्यक्ष काम न करताच २ लाख ६३ हजार ४९० रुपयांची रक्कम अदा केल्याचा प्रकार रावरी बापेरे ग्रामपंचायतीमध्ये घडल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत रावारी बापेरेचे सदस्य धर्मदास कांबळे आणि प्रवीण साळुंखे तसेच मंडळाचे पदाधिकारी संजय बापेरकर आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायत रावारी बापेरे कार्यक्षेत्रातील बौद्धवाडी येथे जुनी नळपाणी योजना सन २०११ ते १२ ला पूर्ण झाली असून २०२२ पर्यंत या योजनेवर कोणताही डागडुजीसाठी खर्च शासनाकडून झालेला नाही. त्यानंतर सन २०१६ ते १७ या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बौद्धवाडी येथील जनतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण जयंती दलितवस्ती नळपाणी सुधार योजना मंजूर झाली होती; मात्र या योजनेचे काम अद्यापही येथील दलित वस्तीत झालेले नाही. याबाबत आपण ग्रामपंचायतीचे सरपंच बाणे तसेच ग्रामसेविका शिवगण यांच्याकडे सदर काम करून देण्याबाबत वारंवार विनंती तसेच मागणी केली होती; मात्र प्रत्येकवेळी या दोघांनीही त्याकडे दुर्लक्ष केले.
या योजनेअंतर्गत बौद्धवाडी येथे कोणत्याही प्रकारचे काम झालेले नसतानाही योजनेची २ लाख ६३ हजार ४९० रुपये ही रक्कम अदा केली. त्यामुळे या दलित वस्तीतील लाभार्थ्यांचे आणि पर्याय शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे दलित वस्तीतील नळपाणी योजनेचे काम न करता रक्कम हडप केली आहे. लाखो रुपयांची रक्कम ही हडप केली म्हणून तातडीने चौकशी व्हावी. चौकशी न झाल्यास येत्या २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य धर्मदास कांबळे आणि ग्रामपंचायत सदस्य प्रवीण साळुंखे यांनी दिला आहे.