राजापूर-उपसलेल्या गाळाची शुक्रवारपासून वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-उपसलेल्या गाळाची शुक्रवारपासून वाहतूक
राजापूर-उपसलेल्या गाळाची शुक्रवारपासून वाहतूक

राजापूर-उपसलेल्या गाळाची शुक्रवारपासून वाहतूक

sakal_logo
By

rat4p36.jpg
73270
राजापूरः गाळ निर्मुलन समिती बैठकीत उपस्थित मान्यवर.
-------------
उपसलेला गाळ टाकणार चिरेखाणीत
शुक्रवारपासून वाहतूक : कामाने घेतला वेग
राजापूर, ता. ४ः शहरातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्रातील गाळ उपसा नगर पालिका, महसूल प्रशासनाच्या सहभागातून आणि लोकसहभागातून केला जाणार आहे. प्रारंभी कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले असून या कामाने आता वेग घेतला आहे. कोदवली नदीपात्रात तसेच कोदवली धरण परिसरात उपसलेला गाळ शुक्रवारपासून (ता. ६) अन्यत्र टाकण्यासाठी वाहतूक केली जाणार आहे.
हा गाळ हा शहर व परिसरात असलेल्या रिकाम्या चिरेखाणींमध्ये टाकला जाणार असून ज्या बागायतदारांना हा गाळ बागेत भरावासाठी व मशागतीसाठी न्यावयाचा आहे, त्यांनी तो न्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाच्यावतीने केले आहे. जवाहर चौकातील नन्हेसाहेब पूल ते पुढे कोदवली अर्जुना संगमापर्यंत या विभागामार्फत गाळ उपसा केला जाणार आहे. कोदवली नदीपात्रातील गाळ उपशाचे काम हाती घेण्यात आले आहे. नदीपात्रातून उपसण्यात आलेला गाळ नदीपात्राच्या बाहेर काढून त्याची वाहतूक करण्यात येणार असून त्याच्या नियोजनासाठी प्रांताधिकारी वैशाली माने यांच्या उपस्थितीत पालिकेच्या सभागृहात बैठक झाली.
या वेळी तहसीलदार शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले, पोलिस निरीक्षक जनार्दन परबकर, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव, ठेकेदार संघटना अध्यक्ष अशफाक हाजू, व्यापारी संघटना अध्यक्ष संदीप मालपेकर, उपाध्यक्ष राजन नवाळे, राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, डॉक्टर असोशिएशनचे डॉ. उत्तम प्रभुदेसाई, व्यापारी प्रशांत पवार, बाळा पोकळे, माजी नगरसेवक सौरभ खडपे, कोंढेतडचे माजी सरपंच अरविंद लांजेकर उपस्थित होते.
या बैठकीमध्ये गाळ वाहतुकीबाबत नियोजन करण्यात आले. गाळ वाहतुकीसाठी राजापूर ठेकेदार संघटना व चिरेखाण संघटनेने मोफत वाहने उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. गाळाची वाहतूक करून हा गाळ लगतच्या चिरेखाणी भरण्यासाठी टाकला जाणार आहे. गाळाची वाहतूक करण्यासाठी जवाहर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज ते पुढे बंदरधक्का, वरचीपेठ मार्गाचा वापर केला जाणार आहे. रानतळे परिसरात गाळ वाहतूक करण्यासाठी आंबेवाडी आयटीआय हर्डी मार्गाचा वापर करण्यात येणार आहे. शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक व जवाहर चौक ते साखळकवाडी रानतळे मार्गावरून गाळ वाहतूक करण्यास सक्त मनाई राहणार आहे. या प्रसंगी वाहनचालक, नागरिक, व्यापारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी माने यांनी केले आहे.