
इन्सुलीत तपासणी नाक्यावर १२ लाखांची दारू पकडली
73318
बांदा ः इन्सुली तपासणी नाक्यावर जप्त केलेल्या दारू आणि चालकासह पोलिस निरीक्षक शामराव काळे, उपनिरीक्षक समीर भोसले. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
इन्सुलीत तपासणी नाक्यावर
१२ लाखांची दारू पकडली
---
गोव्यातून इंदूरला वाहतूक; चालक ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ४ ः गोव्यातून इंदूरला होणाऱ्या बनावट दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर मोठी कारवाई करीत तब्बल १२ लाख ४७ हजार ६१६ रुपयांची दारू पकडली. दहा लाखांचा कंटेनर (एमएच ०४ जीआर ७२३८)ही जप्त केला. दारू वाहतूक प्रकरणी जुल्फिकार ताजअली चौधरी (वय ५६, रा. गाझियाबाद, उत्तर प्रदेश) याला गुन्हा करून ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल (ता. ३) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कंटेनरमधून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. इन्सुली तपासणी नाका येथे बांद्याचे उपनिरीक्षक समीर भोसले, पोलिस प्रथमेश पोवार, विजय जाधव यांनी सापळा रचला. गोव्यातून आलेला कंटेनरला थांबविण्यात आले. चालक संशयस्पदरीत्या बोलत असल्याने संशय आला. कंटेनरच्या हौद्याची तपासणी केली असता त्यात दारू आढळली. हौद्यातून दारू असलेल्या ३४ हजार ६५६ प्लास्टिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. बऱ्याच कालावधीनंतर चेकपोस्टवर दारूविरोधात कारवाई करण्यात आली.
..............