साहित्‍य विचार सन्मान संमेलन अध्यक्षपदी प्रेमानंद गज्‍वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्‍य विचार सन्मान संमेलन अध्यक्षपदी प्रेमानंद गज्‍वी
साहित्‍य विचार सन्मान संमेलन अध्यक्षपदी प्रेमानंद गज्‍वी

साहित्‍य विचार सन्मान संमेलन अध्यक्षपदी प्रेमानंद गज्‍वी

sakal_logo
By

kan53.jpg
73351
प्रेमानंद गज्‍वी

साहित्‍य विचार सन्मान संमेलन
अध्यक्षपदी प्रेमानंद गज्‍वी
सावंतवाडीत कार्यक्रम; कविसंमेलनात सहभागाचे आवाहन
कणकवली, ता. ५ : समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे सावंतवाडीत ८ जानेवारीला साहित्‍य विचार आणि सन्मान संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्‍येष्‍ठ नाटककार प्रेमानंद गज्‍वी असणार आहेत. श्रीराम वाचनमंदिर सावंतवाडी येथे सायंकाळी साडे पाच वाजता संमेलनाला सुरवात होणार आहे.
या संमेलनात विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण, खुले कविसंमेलन आणि सत्कार असे कार्यक्रम आहेत. कवी संमेलनात जिल्ह्यातील सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिष्‍ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह साटम यांनी दिली. साहित्य विचार आणि सन्मान संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांची भारतीय पातळीवरचे महत्त्वाचे मराठी नाटककार अशी ओळख आहे. त्यांच्या ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेने प्रथम लक्ष वेधून घेतले. ही एकांकिका १४ भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली. त्‍यांनी किरवंत, गांधी आंबेडकर, गांधी विरुद्ध गांधी, वांझ माती, तनमाजोरी, जय जय रघुवीर समर्थ, पांढरा बुधवार, रंगयात्री, व्याकरण आदी नाटके लिहिली आहेत.
या संमेलनात श्री. गज्‍वी यांच्या हस्ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांना इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर पुरस्कार, तर कथाकार विवेक कुडू यांना काशीराम आत्माराम साटम स्मृती समाज साहित्य कथा पुरस्कार आणि कवी एकनाथ पाटील यांना प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृती भूमी काव्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तर श्रीराम वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते ॲड.संदीप निंबाळकर यांचा विशेष गौरव नाटककार गज्वी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी मोहन कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि नव्या कवींचे खुले कविसंमेलन होणार आहे.