शिक्षक मतदारसंघात मतदारात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक मतदारसंघात मतदारात घट
शिक्षक मतदारसंघात मतदारात घट

शिक्षक मतदारसंघात मतदारात घट

sakal_logo
By

rat०५३४.txt

(पान ३ साठी)

शिक्षक मतदार संघातील मतदारात घट

३० जानेवारीला मतदान; बाळाराम पाटील पुन्हा रिंगणात

रत्नागिरी, ता. ५ ः कोकण विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषद निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत १३ जानेवारी, अर्जाची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख १६ जानेवारी आहे. ३० जानेवारीला मतदान होणार असून २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कंबर कसली असून निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. गेल्या सहा वर्षात शिक्षकभरती झाली नसल्यामुळे मतदारांची संख्या घटली आहे.
कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांची मुदत ७ फेब्रुवारीला पूर्ण होत आहे. पाटील पुन्हा विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणूक लढवत असून त्यांना महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेकापचा पाठिंबा आहे. कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असून मतदार मोजणी कमी झाली आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शिंदे शिवसेना-भाजपचा पाठिंबा दिला असल्याचे समजते. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वेणूनाथ कडू निवडणूक लढवणार आहेत. शिक्षकभरतीचे रत्नागिरी जिल्ह्यातील धनाजी पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. पाटील यांनी नुकताच मतदार संघात एक दौरा पूर्ण केला असून, कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे. गेल्या सहा वर्षात ५० लक्षवेधी विधानपरिषदेत मांडल्या. वैयक्तिक स्वरूपात शिक्षकांच्या समस्या सोडवल्या आहेत. दरम्यान, गेल्या सहा वर्षात शिक्षकभरती झाली नसल्यामुळे मतदारांची संख्या घटली आहे.
------
४१ हजाराहून अधिक मतदार...
पालघर जिल्ह्यात ९ हजार, ठाणे १५ हजार ७३६, रायगड १० हजार, रत्नागिरी ४ हजार ३२८, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ हजार ४५६ मतदार नोंदणी असून एकूण ४१ हजार ५२० मतदार मतदान करणार आहेत. शिक्षक भरती आभावी मतदार संख्येत घट झाल्याचे चित्र आहे.
-----------