दाभोळ ः सारंग ग्रामपंचायत ही गावपॅनलचीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः सारंग ग्रामपंचायत ही गावपॅनलचीच
दाभोळ ः सारंग ग्रामपंचायत ही गावपॅनलचीच

दाभोळ ः सारंग ग्रामपंचायत ही गावपॅनलचीच

sakal_logo
By

सारंग ग्रामपंचायत गावपॅनलचीच

ग्रामस्थांचे प्रसिद्धीपत्रक ; दावा सांगणाऱ्या राजकीय नेत्यांना फटकारले
सकाळ वृत्तेसवा
दाभोळ, ता. 6 ः दापोली तालुक्यातील सारंग ग्रामपंचायत ही गावपॅनलची ग्रामपंचायत असून सर्व सदस्य व सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर ज्या पक्षांनी दावा सांगितला आहे त्यांना सारंग ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रक काढून आम्ही तुमचे नव्हेत, असे ठणकाऊन सांगितले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे तालुकाप्रमुख उन्मेश राजे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वाधिक ग्रामपंचायती या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडे असल्याचा दावा केला होता; मात्र त्यानंतर देगाव, दमामे ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा दावा फेटाळून या ग्रामपंचायती गावपॅनलच्या आहेत. कोणत्याही पक्षाच्या नाहीत, असे सांगितले होते. या यादीत आता सारंग ग्रामपंचायतीचे नाव जोडले गेले आहे. सारंग ब्राह्मणवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबईच्या लेटरहेडवर अध्यक्ष पांडुरंग कदम, उपाध्यक्ष श्याम भुवड, वाडीअध्यक्ष काशीराम दुसार, सल्लागार सुभाष जोशी यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नवनिर्वाचित सरपंच सुषमा जोशी यांनी सारंग गावाने बिनविरोध निवडून दिले असून आपण गावपॅनलच्या सरपंच असल्याचे सांगितले आहे.
सारंग गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावात बिनविरोध निवडणूक झालेली असून गावपॅनलने त्यांचे सदस्य निवडून दिले आहेत. गावाच्या विकासासाठी मुंबई व ग्रामीण मंडळ एकत्र निर्णय घेऊन पुढील वाटचालीचा निर्णय घेण्यात येईल, असे गावामध्ये ठरले आहे. त्यामुळे कोणीही कोणत्याही वेगळ्या दाव्यावर विश्वास ठेवू नका, असे लेखी आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.