कृतीशील, सुसंस्कृत नेतृत्वं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृतीशील, सुसंस्कृत नेतृत्वं
कृतीशील, सुसंस्कृत नेतृत्वं

कृतीशील, सुसंस्कृत नेतृत्वं

sakal_logo
By

पुरवणीचे डोके ः

मा. किरण उर्फ भैया सामंत वाढदिवस विशेष


swt624.jpg व swt625.jpg
73713
किरण सामंत


कृतीशील, सुसंस्कृत नेतृत्वं

लीड
राजकारण, समाजकारण, उद्योग क्षेत्रात प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून किरण उर्फ भैय्या सामंत यांनी पूर्ण कोकणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ते त्यांच्या सडतोड भूमिकांनी ओळखले जातात. त्यांच्या या भूमिकेचे सारेच कौतुक करतात. शनिवारी (ता.७) त्यांचा ५० वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त...
- प्रतिनिधी
-----------
धडाकेबाज निर्णय आणि कृतीतून कायमच सर्वांच्या आदरस्थानी असलेले किरण उर्फ भैय्या सामंत हे केवळ राजकारणी, समाजकारणी नाहीत तर ते उत्तम उद्योजकही आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ते बंधू आहेत. सामाजिक जीवनात वावरताना सारासार विचार करून त्याला कृतीची पूरक जोड देणारी जी काही मोजकी मंडळी कोकणात आहेत, त्यात त्यांचा अव्वल क्रमांक लागतो. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ज्या तळमळीने, तडफेने शक्य ती मदत करतात, त्याला तोड नाही. त्यामुळेच प्रत्येकाला त्यांच्याप्रती जिव्हाळा, आदर, आपलेपणा वाटतो.
कोकणच्या विकासाची दृष्टी असणारे आणि त्या दृष्टीला कृतीची जोड देणारे किरण सामंत आहेत. त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक विषयाला ते नेहमीच सकारात्मकतेने, संवेदनशीलपणे प्रतिसाद देतात. कोकणच्या मातीशी घट्ट नाळ असलेले भैय्या सामंत संवेदनशील असल्यामुळे कोकणच्या विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करताना त्यांची नेहमीच मदत होते. त्यांच्या या सहकार्याच्या, संवेदनशीलतेच्या भावनेमुळेच कोकणात ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या वागण्या, बोलण्यात कोकणी गोडवा असला तरी ते संवेदशील, मोठ्या मनाचे आहेत. कोकणात सर्वाना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटते. सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्यात कधीही अहंकार, आत्मप्रौढी दिसत नाही हेच त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सामंत यांची सिंधुरत्न समुद्धी योजनेच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात यशस्वीपणे राजकीय रणनीती आखणे अगदी विरोधकांना आपलेसे करण्यात त्यांचे कौशल्य आहे. विकासकामांचे नियोजन करताना समतोल राखत पदाधिकारी कार्यकर्ते यांची कामे वक्तशीरपणे करत आहेत. त्‍याचबरोबर विरोधकांची ही कामे करून त्यांना प्रेमाने आपलेसे करणे ही त्यांची खास कार्यपद्धती राहिली आहे.
उदय सामंत चार वेळा आमदार, तीन वेळा मंत्री झाले; पण त्यांचा मतदारसंघ त्यांच्या मागे सांभाळून ठेवण्यात भैय्या सामंत यांचा सिंहाचा वाटा आहे; पण हे नाव आजवर कधीही राजकीय पटलावर फारसे आलेले नाही; मात्र आता त्यांच्या राजकारणातील प्रवेशाचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत असणारे नाव म्हणजे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत. मूळ शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना शिंदे गटाकडे आकर्षित करण्यामध्ये भैय्या सामंत यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. आजवर पडद्यामागच्या खेळीत माहीर असलेले सामंत आता अधिकृतपणे रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. प्रथमच ते राजकीय आखाड्यात उडी घेत आहेत. ते यशस्वी उद्योजक असून ते निवडणुकीत अनेक ठिकाणी किंगमेकरच्या भूमिकेत दिसून येतात. त्यांचा सर्वसामान्यांशी असलेला जनसंपर्क व त्यांची कामाची पद्धत अनेकांना आवडते. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीमध्ये सामंत हे आवडते व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा.

चौकट
रोजगार निर्मितीला प्राधान्य
सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांतील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती व विकासक्षेत्रांची निवड करून त्या क्षेत्रांचा सूक्ष्म आराखडा तयार करणे व त्या आधारे परिणामकारक अंमलबजावणी करून पर्यावरणक्षम शाश्वत विकास घडवणे हा या योजनेचा उद्देश आहे. लवकरात लवकर कोकणात रिफायनरी प्रकल्प कार्यन्वित झाला तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन तरुणांना नोकऱ्या मिळतील. म्हणूनच हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी उद्योजक किरण सामंत यांनी कंबर कसली असून या प्रकल्पाला कोकणातून पूर्ण समर्थन मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. कोकणातील किंगमेकर म्हणून त्यांची ओळख आहे. आपली बाजू दुसऱ्याला प्रभावीपणे पटवून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या याच कौशल्याचा पुरेपूर वापर करत त्यांनी रिफायनरी समर्थनासाठी साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.