चिपळुणात साकारणार 12 ओपन जीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात साकारणार 12 ओपन जीम
चिपळुणात साकारणार 12 ओपन जीम

चिपळुणात साकारणार 12 ओपन जीम

sakal_logo
By

rat०६१६.txt

(पान ५ साठीमेन)

चिपळुणात साकारणार १२ ओपन जीम

आमदार निकमांचा पुढाकार ; ९० लाखाचा निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. ६ ः सध्या शहरातील विविध भागातून प्रामुख्याने व्यायामशाळा व ओपन जीमची मागणी केली जात आहे. कोरोनाच्या परिस्थितीनंतर नागरिकांनी सुदृढ आरोग्यावर जास्त भर देण्यास सुरवात केली. शहरातील नागरिकांचे आरोग्य अधिक सुदृढ होण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने शहरात तब्बल १२ ठिकाणी ओपन जीम साकारणार आहेत. या जीमसाठी तब्बल ९० लाखांचा निधी मंजूर केला आहे.
शहरात नगर पालिकेच्या दोनच व्यायामशाळा आहेत. त्यामुळे खुल्या मैदानातील ओपन जीम उभारण्याची मागणी जोर धरत आहे. दरवर्षी उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीचा विचार करता ओपन जीमचा पर्याय सोयीचा असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांमधून या विषयीची मागणी होत आहे. त्याची दखल घेत आमदार निकम यांनी शहरात तब्बल १२ ठिकाणी ओपन जीमला साहित्य पुरवणे व बसवण्यासाठी ९० लाखांचा निधी मंजूर केला आहे. शहरातील विविध ठिकाणच्या नगर पालिका जागेत या जीम साकारणार आहेत. यामध्ये विरेश्वर तलाव, नारायण तलाव, पाग लेनवाडी, उक्ताड खेळाचे मैदान, गोवळकोट मैदान, पेठमाप मराठी शाळा, राधाकृष्ण नगर येथे मीनाताई ठाकरे उद्यान, काविळतळी खुले मैदान, खेंड स्वरविहार, गोवळकोट मैदान, कन्याशाळा व शंकरवाडी येथे जीम उभारण्यात येणार आहेत. या जीममध्ये विविध अद्ययावत साहित्य बसवण्यासाठी प्रत्येकी दोन जीमसाठी सुमारे १६ लाख इतका खर्च येणार आहे. त्यानुसार शहरातील १२ ओपन जीमसाठी ९० लाखाचा निधी आमदार निकम यांनी मंजूर केला आहे.
--

फुलपाखरू उद्यानासाठी २५ लाख

शहरातील रामतिर्थ तलावाशेजारील जलतरण तलावाच्या नूतनीकरणासाठी ७५ लाख, (कै.) अण्णासाहेब खेडेकर क्रीडासंकूल इमारतीमध्ये बॅडमिंटन कोर्ट तयार करणे व इनडोअर खेळासाठी सुविधा पुरवण्यासाठी ५० लाख रुपये, तर आरक्षण क्र. १४३ खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी २५ लाख, काविळतळी येथील फुलपाखरू उद्यानासाठी २५ लाखाचा निधी मंजूर केला आहे. बाजारपेठेतील आरक्षण क्रमांक ४१ मधील पार्किंग क्षेत्रासाठी २५ लाख, शंकरवाडी नारायण कदम यांच्या घरामागील नवीन वसाहतीत बगीचा विकसित करण्यासाठी १५ लाख, खेंडचौकी येथे वाशिष्ठी नदीकिनारी धोबीघाटासाठी १५ लाखाचा निधी आमदार निकम यांनी मंजूर केला आहे.