मळगाव हायस्कूलचे मंगळवारी स्नेहसंमेलन

मळगाव हायस्कूलचे मंगळवारी स्नेहसंमेलन

Published on

मळगाव हायस्कूलचे १० ला स्नेहसंमेलन
सावंतवाडी ः मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव या प्रशालेचा ६२ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन आयोजित केले आहे. हा समारंभ मंगळवारी (ता. १०) सकाळी साडेदहाला प्रशालेच्या वा. भ. कांबळी स्मारक रंगमंच व जीवाजी नारायण पाडगावकर सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबईचे सचिव आर. आर. राऊळ असून, प्रमुख पाहुणे म्हणून म्हापसा-गोवा येथील उद्योजक अशोक झारापकर, शाळा समिती चेअरमन मनोहर राऊळ उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत सकाळी साडेदहाला ईशस्तवन, स्वागतगीत, पाहुण्यांची ओळख व स्वागत प्रास्ताविक, अहवाल, संदेश वाचन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पारितोषिक वितरण, मान्यवरांची भाषणे व आभार प्रदर्शन, सायंकाळी साडेसहा ते दहापर्यंत विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक एम. बी. फाले, सांस्कृतिक विभागप्रमुख ऋतुजा सावंत-भोसले, शालेय सांस्कृतिकमंत्री सिया नाटेकर, शालेय मुख्यमंत्री दिया वायंगणकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com