कॅन्टीनमध्ये मुदत संपलेल्या बिस्किट पुड्यांची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅन्टीनमध्ये मुदत संपलेल्या बिस्किट पुड्यांची विक्री
कॅन्टीनमध्ये मुदत संपलेल्या बिस्किट पुड्यांची विक्री

कॅन्टीनमध्ये मुदत संपलेल्या बिस्किट पुड्यांची विक्री

sakal_logo
By

rat०७१३.txt

(पान ३ साठी)

मुदत संपलेल्या बिस्किट पुड्यांची विक्री

कोकण कृषी विद्यापीठ ; ठेकेदाराविरोधात कर्मचारी संतप्त

दाभोळ, ता. ७ ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या कॅन्टीनमध्ये मुदत संपून गेलेल्या बिस्किट पुड्यांची विक्री केली याबाबत विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराला विचारणा केली. पण उलट उत्तर दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयाच्या इमारतीमधील तळमजल्यावर विद्यापीठाचे कॅन्टीन आहे. हे कॅन्टीन ठेका पद्धतीने चालवायला दिले आहे. काही दिवसांपूर्वी तेथे चहा पिण्याकरिता आलेल्या वाहनचालकांनी चहासोबत बिस्कीटपुडाही घेतला. त्यातील बिस्किटे खाताना त्याची चव वेगळी लागली. त्यांनी संपूर्ण पुडा उघडून पाहिला तर बिस्किट पुड्यामध्ये छोटी छोटी पाखरं मरून पडलेली त्यांना आढळून आली. हे सर्व पाहिल्यावर त्यांनी बिस्किट पुड्यावरील मुदत तपासली असता ती मुदत उलटून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सर्व कर्मचाऱ्यांनी कॅन्टीन चालकाला याबाबत विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनाच दुरुत्तरे करून बिस्किट पुड्यावरील तारीख तपासत बसणे एवढेच माझे काम आहे का? असे उत्तर दिले. त्यामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टीन चालकावर तसेच बिस्किटे पुरवठादारावर कारवाई करावी, अशी मागणी विद्यापीठातील वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष राकेश विचारे यांनी केली आहे.