
दापोली नगरपंचायतीच्या 2001 पासूनच्या
rat०७१५.txt
( पान ३)
दापोली नगरपंचायतीच्या आर्थिक
व्यवहारांच्या चौकशीचे आदेश
दाभोळ, ता. ७ ः दापोली नगरपंचायतीच्या २००१ पासून सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिले आहेत. चौकशी कोणाकडून होणार व या चौकशीमध्ये काय काय निष्पन्न होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दापोली नगरपंचायातीमध्ये सत्ताधारी असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी आघाडीच्या नगरसेवकांनी आर्थिक घोटाळा उघड केल्यावर दापोलीत खळबळ उडाली. नगरपंचायत प्रशासनाने केवळ १ वर्षाचीच आर्थिक व्यवहारांची तपासणी करून तत्कालीन लेखापाल दीपक सावंत यांच्याविरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी दीपक सावंत यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. सध्या या प्रकरणाची चौकशी जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. दापोली दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ममता मोरे यांनी नगरपालिका प्रशासन आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे दीपक सावंत यांच्या कारकिर्दीतील सर्वच व्यवहारांची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दापोली नगरपंचायतीच्या २००१ पासून सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिले आहेत. आता ही चौकशी कोणाकडून होणार व या चौकशीमध्ये काय काय निष्पन्न होते, याकडे दापोलीकरांचे लक्ष लागले आहे.