बुडालेला खलाशी अद्याप बेपत्ताच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुडालेला खलाशी अद्याप बेपत्ताच
बुडालेला खलाशी अद्याप बेपत्ताच

बुडालेला खलाशी अद्याप बेपत्ताच

sakal_logo
By

rat०७३१.txt

(पान ३ साठी)

बुडालेला खलाशी अद्याप बेपत्ताच

गुजरातची नौका ; तीन दिवसानंतरही शोध सुरूच

रत्नागिरी, ता. ७ ः गुजरातवरून महाराष्ट्राच्या हद्दीत मासेमारी करण्याकरिता आलेल्या गुजरातमधील रत्नसागर नौकेला रत्नागिरीपासून ९५ नॉटिकल मैल अंतरावर जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत ३ खलाशी बुडाल्याची माहिती कोस्टगार्डला देण्यात आली. यातील दोघांचे मृतदेह सापडले असून १ खलाशी अद्यापही बेपत्ता आहे; मात्र आज तीन दिवस झाले तरी बेपत्ता झालेला अद्याप सापडलेला नाही. त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती तटरक्षक दलाकडून प्राप्त झाले नसल्याचे मत्स्यविभागाने सांगितले. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली होती.

गुजरात राज्यातील ४ नौका मासेमारीकरिता महाराष्ट्र राज्याच्या सागरी हद्दीत आल्या होत्या. रात्रीच्यावेळी जेवण करून समुद्रात नौका नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. नौकांवरील खलाशी हे आराम करत होते. त्याचवेळी खोल समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि बघता बघता सर्व नौका हेलकावे खाऊ लागल्या. काही कळायच्या आत एका नौकेला या वादळाचा तडाखा बसला.
गुजरात राज्यातील तलासरी येथील रत्नसागर या नौकेला हवामानाचा फटका बसला आणि फळी उचकटून नौकेत पाणी शिरू लागले. खलाशी नौकेच्या केबिनखाली झोपले होते तर काही खलाशी बाहेर झोपले होते. बघता बघता पाण्याचा प्रवाह वाढत असताना खलाशांची ओरडाओरड सुरू झाली. काही क्षणात नौका बुडाली. अचानक पाणी शिरल्यानंतर सावध झालेल्या ४ खलाशांनी पाण्यात उड्या घेतल्या, तर नौकेत झोपलेले ३ खलाशी मात्र नौकेसह बुडाले. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये सुरेश वळवी (वय ६०) व रणछोड केशव थापनिया (वय ५५, रा. गुजरात) या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे तर नौकेत झोपलेला मधुकर चैत्या खटल हे पाण्यात बुडून बेपत्ता झाला आहे. त्याचा शोध तटरक्षक दलाकडून सुरू होता. खोल समुद्रात ही दुर्घटना घडल्याने अजूनही त्यांचा शोध सुरू असल्याची अधिकृत माहिती मत्स्य विभागाने दिली.