शिक्षण-सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षण-सदर
शिक्षण-सदर

शिक्षण-सदर

sakal_logo
By

२ जानेवारी टुडेपान २ वरून लोगो व लेखकाचा फोटो घेणे....

फोटो ओळी
-rat८p११.jpg ः डॉ. गजानन पाटील
------------
शिक्षण ः लोकल टू ग्लोबल

इंट्रो

शिक्षणाचा एक नियम सांगतो की, जर सकारात्मक प्रेरणा दिली तर अध्ययन चांगलं होतं. तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सकारात्मक प्रेरणा दिली तर कामात बदल होतो. आज-कालच्या शिक्षणपद्धतीमध्ये अनेक समस्या उद्भवू लागलेल्या आहेत. क्षेत्रीय अधिकारी कामामुळे त्रस्त झालेले आहेत. त्यांनी शाळाभेटी द्यायच्या, शिक्षकांना प्रेरित करायचे की, प्रशासकीय काम करत बसायचे हा मोठा प्रश्न आजमितीला पडला आहे. सन २०११-१२ मध्ये मात्र यावर एक तोडगा काढण्यात आला होता. त्याचा परिणाम संपूर्ण राज्यभरातील आपल्या शिक्षणव्यवस्थेवर अतिशय चांगल्याप्रकारे झाला होता. जर क्षेत्रिय अधिकाऱ्याला प्रेरित केले तर तो नव्या उत्साहाने आपल्या हाताखालच्या मुख्याध्यापक, शिक्षक यांना तो प्रेरित करतो. एकूणच शिक्षणव्यवस्था स्वयंप्रेरित होते. काम करण्यात एक आनंद आणि उत्साही असतो याची अनुभूती मी स्वतः घेतलेली आहे.

- डॉ. गजानन पाटील
------------
परिवर्तन शक्य आहे, फक्त प्रेरणा हवी

सन २०११ मध्ये तत्कालीन राज्य प्रकल्प संचालक नंदकुमार यांनी एसईआरटीमध्ये एक बैठक घेतली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीमध्ये त्यांनी सर्व डाएटच्या प्राचार्यांना एक प्रश्न विचारला होता की, क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी आपण काय करू शकतो? तेव्हा मी उत्तर दिलं होतं की, आपण क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रेरणा देऊ शकतो. मग त्यांनी विचारलं की, अशी प्रेरणा आपल्यापैकी कोण देऊ शकेल? तेव्हा मी उभा राहून ठामपणे सांगितले होते की, अशी प्रेरणा मी राज्यातील सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देऊ शकतो. एका क्षणाचाही विचार न करता नंदकुमार यांनी या माझ्या विधानावर मला तोंडी परवानगी दिली. सर्वांना प्रश्न पडला हे कसं शक्य आहे? तेव्हा मी डाएट रत्नागिरीला प्राचार्य म्हणून काम करत होतो. त्यानंतर प्रथम एक नियोजन केले. रायगडला सर्व शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्यासाठी एकदिवशीय आनंददायी प्रेरणा शिबिर घेतले. त्या शिबिराचा आढावा घेऊन त्याच्यावर एक रिपोर्ट तयार केला. तो रिपोर्ट नंदकुमार यांना दाखवला. त्यांनी त्यावर मला परवानगी दिली की, रिपोर्ट सकारात्मक आहे. संपूर्ण राज्यभरात या शिबिराला सुरवात करा. या सकारात्मक प्रेरणेमुळे मी आणि माझे सहकारी डॉ. कामशेट्टी यांनी प्रभावित होऊन पुढे ३३ जिल्ह्यांमध्ये ५६ दिवसांचा प्रवास करून साडेदहा हजार क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी एक दिवस आनंदी प्रेरणा शिबिर घेतले. शासनाचा कोणताही पैसा खर्च न करता हा कार्यक्रम स्वखर्चाने केला. चंद्रपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत अनेक अनुभव आले. हे आनंददायी प्रेरणा शिबिर सकाळी १० वा. सुरू होऊन सायंकाळी ५ वा. संपायचे. एका मोठ्या हॉलमध्ये किंवा थिएटरमध्ये हे शिबिर व्हायचे. यात वेगवेगळ्या प्रकाराचे स्लाईड शो, व्हिडिओज, संवाद, चर्चा, समस्या, आरोग्य, ध्यानधारणा आणि प्रेरणादायी व्याख्यान व्हायचे. या माध्यमातून सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कामासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी प्रेरित केलं गेलं. संपूर्ण राज्यभर फिरत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. गडचिरोलीमध्ये तर उत्तम प्रतिसाद मिळाला. ३३ जिल्ह्यांत शिबिर झाल्यावर त्यावर घेतलेल्या लेखी अभिप्रायावरून एक विश्लेषणात्मक रिपोर्ट तयार करून राज्य सरकारला सादर केला . त्यामध्ये असं दिसून आलं की, क्षेत्रीय अधिकाऱ्याला प्रेरणा दिल्यानंतर क्षेत्रीय अधिकारी प्रभावीपणे आपल्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करू शकतो. त्याला प्रेरणेची गरज आहे. शक्य आहे परिवर्तन फक्त प्रेरणा हवी. त्यांना थोडा आत्मविश्वास दिला की, लोकं काम करू शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला दिसून आली ती म्हणजे ७२ टक्के क्षेत्रीय अधिकारी हे मधुमेहाने त्रस्त होते तर ५१ टक्के अधिकारी हे रक्तदाब, हृदयविकाराने त्रस्त होते. यावरची उपायोजना आनंददायी प्रेरणा शिबिरात सांगितल्यामुळे पुढे आम्हाला अनेक लोकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आजही ही मंडळी आवर्जून या आनंददायी प्रेरणा शिबिराचा उल्लेख करून आम्ही आरोग्यदृष्ट्या ठणठणीत असल्याचे सांगतात. म्हणूनच मला असं वाटतं की, नवशिक्षणाचा ध्यास धरलेल्या आपल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी दर सहा महिन्यातून एकदातरी आनंददायी प्रेरणा शिबिर घ्यावेच लागेल.
(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)