सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रप्रेम जपा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रप्रेम जपा
सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रप्रेम जपा

सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रप्रेम जपा

sakal_logo
By

टीपः swt८२४.jpg मध्ये फोटो आहे.
सावंतवाडी ः राजवाडा येथे कार्यक्रमाचे उद्‌घाटन करताना सौ. उमा प्रभू. शेजारी इतर.

सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रप्रेम जपा

उमा प्रभू ः सावंतवाडीत अटल प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण

सावंतवाडी, ता. ८ ः माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यादूरदृष्टीत आकाशाला गवसणी घालण्याची ताकद होती. मात्र, असे असतानाही त्यांचे पाय हे नेहमीच जमिनीवर राहीले, असे मत मानव संसाधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांनी मांडले. सामाजिक बांधिलकीतून काम करत असताना प्रत्येकाने राष्ट्रप्रेम काळजात उमटवून काम करावे, असेही त्या म्हणाल्या.
जिल्ह्यात सातत्याने गेली एकोणीस वर्षे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भारतरत्न अटलजींच्या नावे स्थापन झालेल्या अटल प्रतिष्ठान या न्यासाच्यावतीने १९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दहा मान्यवरांना अटल गौरव पुरस्काराने आज गौरविण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपिठावर संयुक्त सचिव अॅटोमिक एनर्जी भारत सरकारच्या सौ. सुषमा तायशेटे, स्नेहालय अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर व कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर उपस्थित होते.
यावेळी स्नेहालय अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गिरीश कुलकर्णी, गरिबांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी धडपडाणारे डॉ. अमेय देसाई, मुंबई, पुण्यामध्ये दलित, शोषित, दिव्यांग, वंचित घटकांसाठी अहोरात्र झटणारे पुण्याचे ज्ञानेश्वर उर्फ माउली दारवटकर, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचा आदर्श वारसा जपणारे दैनिक ‘सकाळ’ सिंधुदुर्गचे वरिष्ठ उपसंपादक शिवप्रसाद देसाई, ईलेक्ट्रॉनिक मिडीयामध्ये जनसामान्यांच्या प्रश्नांना जाहीरपणे वाचा फोडणारे ऋषी देसाई, साहित्यिक क्षेत्रात विशेष ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सौ. उषा परब, अतिशय प्रतिकुल परिस्थितीत संषर्घ करुन जिल्ह्याच्या उद्योग जगतात यशस्वी वाटचाल करणारे यशस्वी उद्योजक राजेंद्र केसरकर, शिक्षण क्षेत्रातील आव्हाने पेलून बॅ. नाथ पै यांच्या विचारांचा वारसा जोपासणारे शिक्षण महर्षी उमेश गाळवणकर, आदिवासी समाजाला मुख्यप्रवाहात आणून त्यांना खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यासाठीचे हक्क मिळवून देणारे उदय आईर, मोठ्या कष्टाने आणि परिस्थितीशी संघर्ष करुन मराठी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत कोकणचे नाव सातासमुद्रापार करणारे कलाप्रेमी साईनाथ जळवी अशा दहा जणांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी युवराज लखमराजे भोसले यांनीही मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पार्सेकर यांनी प्रास्ताविक केले. सिंधुदुर्गकन्या, नृत्यांगना व वयम् डान्स स्टुडिओ पुणेच्या संचालिका सौ. स्नेहल पार्सेकर हिने स्वरचित केलेला भरतनाट्यम नृत्याविष्कार तसेच शिशुवाटिकेच्या चिमुकल्यांचाही कार्यक्रम झाला.
यावेळी प्रतिष्ठानच्या ‘राष्ट्रसाधना’ स्मरणिकेचे प्रकाशनही झाले.
--
दुर्लक्षितांसाठी काम करा
तायशेटे म्हणाल्या, ‘‘अटल प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत असलेले पार्सेकर हे महान व्यक्तिमत्व आहे आणि म्हणूनच त्यांच्यामुळे समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महान व्यक्तींचा गौरव आज येथे घडला. मुळात सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ज्यांना मदतीची गरज आहे, अशांसाठी काम करावे. हे काम स्वतःच्या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी व राज्यासाठी करावे. म्हणजेच हे काम पुढे जाऊन देशासाठी ठरेल. आज कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. इथे विविध रत्ने निर्माण झाली आहेत. मात्र, अशी काही दुर्लक्षित माणसे आहेत, त्यांना आज मदतीची गरज आहे. अशांसाठी सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी काम करावे.’’