मुणगेच्या विकासासाठी कटिबद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुणगेच्या विकासासाठी कटिबद्ध
मुणगेच्या विकासासाठी कटिबद्ध

मुणगेच्या विकासासाठी कटिबद्ध

sakal_logo
By

74272
मुणगे ः येथे देवी भगवतीच्या दर्शनासाठी आलेल्या आमदार नीतेश राणे यांचे स्वागत करताना देवस्थान अध्यक्ष ओंकार पाध्ये, सरपंच साक्षी गुरव, गोविंद सावंत, संतोष किंजवडेकर, वसंत शेट्ये आदी. (छायाचित्र ः विश्वास मुणगेकर)

मुणगेच्या विकासासाठी कटिबद्ध

आमदार नीतेश राणे ः देवी भगवती जत्रोत्सवानिमित्त घेतले दर्शन

सकाळ वृत्तसेवा
मुणगे, ता. ९ ः येथील जत्रोत्सवानिमित्त ग्रामदेवता श्री देवी भगवतीचे दर्शन घेण्याचा योग घडून आला. त्यामुळे मनाला समाधान मिळाले. देवी भगवती मंदिराचे सुशोभीकरण व गावच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे. जी कामे माझ्याकडे येतील, ती प्राधान्याने करण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही आमदार नीतेश राणे यांनी दिली. त्यांनी येथील जत्रोत्सवानिमित्त भगवती देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
देवगड-कणकवली मतदारसंघाचे आमदार राणे यांनी येथील देवी भगवतीच्या जत्रोत्सवानिमित्त दर्शनासाठी उपस्थिती दर्शविली. देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष दिलीप महाजन, सचिव निषाद परुळेकर, मुणगे सरपंच साक्षी गुरव, उपसरपंच संजय घाडी, भाजपा देवगड तालुका सरचिटणीस संजय बांबुळकर, प्रकाश राणे, भगवती विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, मुणगेचे चेअरमन गोविंद सावंत, दिलीपकुमार महाजन, देवगड तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, देवस्थान समिती सदस्य वसंत शेट्ये, मनोहर मुणगेकर, देवदत्त ऊर्फ आबा पुजारे, संदीप घाडी, ग्रामपंचायत सदस्या अंजली सावंत, दशरथ मुणगेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार राणेंनी देवी भगवती स्वागत कक्षाला भेट दिली. त्याबद्दल देवस्थानचे सचिव परुळेकर यांनी आभार मानले.
---
देवी भगवतीच्या दर्शनाने समाधान
यावेळी आमदार राणे म्हणाले, येथील ग्रामपंचायत आपली आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून ज्या कामाची निवेदने येतील, ती प्राधान्याने घेऊन कामे घेतली जातील. देवी भगवती मंदिराच्या सुशोभीकरण व गावाच्या विकासासाठी जातीनिशी लक्ष घालून जास्तीत जास्त विकासकामे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मुणगे गावच्या देवी भगवतीचे दर्शन घेऊन समाधान मिळाले, असे मत व्यक्त केले.