पुन्हा सत्ता द्या, यापेक्षाही भव्य महोत्‍सव करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुन्हा सत्ता द्या, यापेक्षाही भव्य महोत्‍सव करू
पुन्हा सत्ता द्या, यापेक्षाही भव्य महोत्‍सव करू

पुन्हा सत्ता द्या, यापेक्षाही भव्य महोत्‍सव करू

sakal_logo
By

74289
कणकवली : येथील पर्यटन महोत्‍सवाच्या समारोप कार्यक्रमात बोलताना आमदार नीतेश राणे, बाजूला नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व इतर मान्यवर (छायाचित्र : प्रथमेश जाधव)

पुन्हा सत्ता द्या, यापेक्षाही भव्य महोत्‍सव करू

नीतेश राणे : कणकवली पर्यटन महोत्‍सवाची सांगता

कणकवली, ता.९ : पाच वर्षांपूर्वी कणकवलीच्या विकासाची ग्‍वाही दिली होती. कणकवलीकरांनी आम्‍हाला सत्ता दिल्‍यानंतर आम्‍ही सर्व आश्‍वासने पूर्ण करून दाखवली. आता पुन्हा सत्ता द्या, यंदापेक्षाही भव्यदिव्य पर्यटन महोत्‍सव पुढच्या वर्षी करू, अशी ग्‍वाही आमदार नीतेश राणे यांनी दिली.
गायिका बेला शेंडे यांच्यासह गायक रोहित राऊत आणि सलमान अली यांच्या संगीत मैफलीने कणकवली पर्यटन महोत्‍सवाची सांगता झाली. या समारोप कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरपंचायत गटनेते संजय कामतेकर, अबिद नाईक, विराज भोसले, अभिजित मुसळे, शिशिर परूळेकर, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे आदी उपस्थित होते.
श्री.राणे म्‍हणाले, कणकवलीकरांनी कायम आमच्यावर विश्‍वास दाखवला आहे. त्‍यामुळे शहरवासीयांसाठी आम्‍ही असेच भव्यदिव्य पर्यटन महोत्‍सव दरवर्षी साकारणार आहोत. नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले, राणे यांच्यामुळेच कणकवलीच्या विकासाचे अनेक प्रश्न सुटू शकले आहेत. त्‍यामुळे पुढील काळातही आमच्यावरील विश्‍वास कायम ठेवा. यावेळी सूत्रसंचालक श्याम सावंत आणि राजेश कदम यांचा सत्‍कार करण्यात आला.
---
सरकारकडून २२ कोटींचा निधी
राणे म्हणाले, आता पुढील पाच वर्षांसाठीही कणकवलीकरांनी आम्‍हाला संधी द्यावी, जेणेकरून कणकवलीचा संपूर्ण चेहरा मोहरा विकासाच्या माध्यमातून बदलता येईल. राज्‍यातील शिंदे फडणवीस सरकारने तब्बल २२ कोटींचा निधी कणकवली नगरपंचायतीला दिला आहे. येत्‍या तीन महिन्यांत आणखी निधी आणून स्पोटर्स कॉम्प्लेक्‍स, बारमाही धबधबा आणि इतर कामे पूर्ण करणार आहोत.