निरवडे-माळकरवाडी येथे 15 ला रस्सीखेच स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरवडे-माळकरवाडी येथे 15 ला रस्सीखेच स्पर्धा
निरवडे-माळकरवाडी येथे 15 ला रस्सीखेच स्पर्धा

निरवडे-माळकरवाडी येथे 15 ला रस्सीखेच स्पर्धा

sakal_logo
By

निरवडे-माळकरवाडी येथे
१५ ला रस्सीखेच स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १० ः निरवडे-माळकरवाडी येथील महापुरुष कला, क्रीडा मंडळाच्या माध्यमातून १५ ला माळकरवाडी येथील पटांगणावर ''एक गाव एक संघ'' अशा पध्दतीने जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी राष्ट्रीयस्तरावर रस्सीखेच स्पर्धेत सहभागी झालेली महिला खेळाडू अर्पिता राऊळ यांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण महिला अध्यक्षा तथा सावंतवाडी पक्षनिरीक्षक अर्चना घारे-परब, पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, निरवडे सरपंच सुहानी गावडे, सोनुर्ली सरपंच नारायण हिराप, न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, माजी सरपंच सदा गावडे आदी उपस्थित राहणार आहेत. तर स्पर्धेच्या समारोप प्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ आदी उपस्थित राहणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम रोख दहा हजार रुपये आणि चषक, तर द्वितीय पाच हजार रुपये आणि चषक अशी पारितोषिके आहेत. तसेच बेस्ट फ्रंट मॅन, लास्ट मॅन यांना विशेष बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे. इच्छुक संघांनी सुनील माळकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने केले आहे.