राजापूर ःघरपट्टी 52 टक्के, पाणीपट्टीची 56 टक्के वसुली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःघरपट्टी 52 टक्के, पाणीपट्टीची 56 टक्के वसुली
राजापूर ःघरपट्टी 52 टक्के, पाणीपट्टीची 56 टक्के वसुली

राजापूर ःघरपट्टी 52 टक्के, पाणीपट्टीची 56 टक्के वसुली

sakal_logo
By

घरपट्टी ५२, पाणीपट्टीची ५६ टक्के वसुली

राजापूर तालुक्यातील स्थीती; शंभर टक्के वसुलीचे ग्रामपंचायतींपुढे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १० ः ग्रामपंचायतींच्या हक्काचा उत्पन्नाचा स्रोत असलेल्या घरपट्टीची ५२ टक्के आणि पाणीपट्टीची ५६ टक्के वसुली करण्यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींना यश आले आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये ४८ टक्के घरपट्टी तर ४६ टक्के पाणीपट्टीची वसुली करण्याचे आव्हान ग्रामपंचायतींसमोर ठाकले आहे. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये शंभर टक्के वसुली करण्यात ग्रामपंचायतींना आलेले यश पाहता हे आव्हान ग्रामपंचायतींकडून विशेषतः भाऊंकडून यशस्वीरित्या पेलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गावविकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून ग्रामपंचायतींना थेट निधी मिळत असला तरी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली ही गावच्या ग्रामपंचायतींच्या हक्काचा उत्पन्नाचा स्रोत आहे. त्याची दरवर्षी ग्रामपंचायतींमार्फत वसुली केली जाते. गेल्या सुमारे ९ महिन्यांमध्ये ’भाऊं’नी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीमध्ये लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. पाणीपट्टीच्या एकूण १ कोटी ४६ लाख ५७ हजार २७० रुपयांच्या मागणीपैकी ८१ लाख ४४ हजार ३०८ रुपयांची वसुली झाली आहे. अद्यापही ६५ लाख १२ हजार ९६२ रुपयांची वसुली शिल्लक आहे तर, घरपट्टीमध्ये ३ कोटी ८८ लाख ७७ हजार ४२८ मागणीपैकी २ कोटी २५ लाख ९९ हजार ०५९ वसुली झाली आहे. १ कोटी ६२ लाख ७८ हजार ३६९ रुपयांची वसुली शिल्लक आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये शिल्लक असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली करण्याचे आव्हान ग्रामपंचायतींसमोर ठाकले आहे.

चौकट ः

दृष्टिक्षेपात पाणीपट्टी वसुली ः
एकूण मागणी ः १ कोटी ४६ लाख ५७ हजार २७० रु.
एकूण वसुली ः ८१ लाख ४४ हजार ३०८ रु.
येणेबाकी ः ६५ लाख १२ हजार ९६२ रु.
........

दृष्टिक्षेपात घरपट्टी वसुली ः
एकूण मागणी ः ३ कोटी ८८ लाख ७७ हजार ४२८ रु.
एकूण वसुली ः २ कोटी २५ लाख ९९ हजार ०५९ रु.
येणेबाकी ः १ कोटी ६२ लाख ७८ हजार ३६९ रु.